माणसांची चाहूल लागताच खिडकी फोडून जंगलात पळाला
गुहागर तालुक्यातील वडद येथील पूजा चंद्रकांत शिंदे यांच्या घरात रात्री दोन वाजता बिबट्या शिरला. सुदैवाने यावेळी घरात कोणीच नव्हते. शेजारच्या घरातील मंडळींना रात्री शिंदेच्या घरातून आवाज आला. म्हणून मंडळी पहाण्यासाठी गेली तेव्हा हॉलमध्ये असलेल्या बिबट्याने माणसांची चाहूल लागताच बंद खिडकीवर झेप घेतली आणि खिडकी फोडून बिबट्या जंगलात पसार झाला. A leopard entered house

A leopard entered house
गेले 15 दिवस वडद गावात सायंकाळी बिबट्या फिरताना दिसतो. याबाबतची माहिती सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांनी वन विभागाला कळविली आहे. 20 तारखेला रात्री बिबट्या वडदचे ग्रामदैवत व्याघ्रांबरी मंदिर परिसरात फिरत होता. या मंदिराशेजारीच गणपतवाडी आहे. तेथे पूजा चंद्रकांत शिंदे रहातात. घरात कोणीच सोबतीला नसल्याने बिबट्याच्या भितीने पुजा शिंदे रात्री जेवण आटपल्यावर आवराआवर करुन शेजारील घरात झोपायला गेल्या होत्या. मध्यरात्री दोनच्या सुमारास घराच्या मागील बाजुल असलेल्या पडवीवर कोणीतरी पडल्यासारखा आवाज आला. या आवाजाने शेजारील मंडळी जागी झाली. शिंदेच्या घरात चोरटा तर शिरला नाही ना अशी शंका आली. म्हणून पुजा शिंदे यांनी सावधपणे घराचे कुलप उघडले. हळुवार दरवाजा उघडत असतानाच हॉलमधील खिडकीची काच फुटली. त्या खिडकीतून बिबट्याला बाहेर जाताना पाहीले. A leopard entered house

The leopard escaped by breaking the window.
आज (21 जुलै) सकाळी सरपंच सौ. कोमल मुरमुरे, उपसरपंच संदीप धनावडे, पोलीस पाटील सौ. चारुता सोमण, तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र करजकर, ग्रामस्था भिकाजी काजारे यांनी चंद्रकांत शिंदे यांच्या घराची पहाणी केली. त्यावेळी घरामागील पडवीवर उडी टाकून तेथील अधर्वट उघड्या खिडकीतून बिबट्या आता आल्याचे लक्षात आले. घरातील जमीनीवर बिबट्याच्या नखांचे ओरखडे दिसत होते. अचानक घराचा दरवाजा उघडण्याच्या आवाजाने बिबट्या सावध झाला. त्याने बंद खिडकीवर उडी मारली. त्यामुळे खिडकीची काच फुटली. त्यातून बिबट्या बाहेर पडून जंगलात पसारा झाला. त्यावेळी फुटलेल्या काचांना आणि खिडकीजवळ बिबट्याची भिस (केस) चिकटलेले सर्वांना पहायला मिळाले. A leopard entered house

या संदर्भात बोलताना वडदचे उपसरपंच संदिप धनावडे यांनी सांगितले की हा बिबट्या भक्ष्य शोधण्यासाठी लोकवस्तीत शिरत आहे. सध्या गावातील भटकी कुत्री नाहीशी झाली आहेत. आता बिबट्याने मांजरांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. गावातील 5 ते 6 घरातील मांजरे नाहीशी झाली आहेत. चंद्रकांत शिंदे यांच्या घरातही मांजराचा पाठलाग करताना बिबट्या घुसला होता. हा बिबट्या वयाने लहान असावा असे फुटलेल्या काचेवरुन दिसत आहे. वनविभागाने आतातरी या गोष्टीची दखल घेवून वडद गावात पिंजरा लावावा व फिरणारा बिबट्या पकडावा. अशी मागणी यावेळी सरपंच कोमल मुरुमुरे यांनी केली आहे. A leopard entered house
शेजारी झोपायला गेल्याने आज माझा जीव वाचला. तसेच हॉलमधील खिडकीला बाहेरुन ग्रील बसवले नसल्याने काच फोडून पळण्यात बिबट्याला यश आले. अन्यथा बिबट्याने त्यावेळीही आमच्यावर हल्ला केला असता. असे यावेळी श्रीमती पुजा शिंदे यांनी सांगितले.
