गुहागर : काही दिवसापूर्वी शृंगारतळी बाजारपेठमधील दुकानदार विरेंद्र उर्फ भाई चौगुले यांच्या शृंगारतळी गणेशनगर येथील गादी कारखानाला आग लागून लाखोंचे नुकसान झाले होते. हे नुकसान त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडचे होते. अशा वेळी काही सामाजिक संस्था त्यांच्या मदतीला धावून येत आहे. अशावेळी शृंगारी मुस्लीम समाजातर्फे भाई चौगुले यांना धनादेश सुपूर्द करून आर्थिक मदतीचा हात देण्यात आला.A financial help from Muslim Samaj
जमातुल मुस्लिमीन शृंगारी या संस्थेने सांगली, चिपळूणचा महापूर असो अथवा कोरोनाचा काळ असो अनेक घरांच्या चुली पेटवण्याचे काम केले आहे. संस्थेच्या या सामाजिक कार्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. यावेळी जमातुल मुस्लिमीन शृंगारीचे अध्यक्ष श्री. हुसैनभाई बोट, श्री. शाबीरभाई साल्हे, श्री.अहमद धामस्कार, ज्येष्ठ व्यापारी नासीमशेठ मालाणी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मोहन संसारे, मौलाना युनूस मुल्लाजी, गणी भाई मुल्लाजी आदी उपस्थित होते. A financial help from Muslim Samaj
