कार्यकाळाच्या अंतिम टप्प्यात दोन नव्या चेहऱ्यांना संधी
गुहागर, ता. 04 : गुहागर नगरपंचायतीच्या अखेरच्या मुदतीत सभापती पदावर 2 नव्या चेहऱ्यांना शहर विकास आघाडीने संधी दिली. भाजप विरोधात बसल्याने पुन्हा एकदा एक समिती सभापतीविना गठीत करावी लागली आहे. A Committee without Chairman

A Committee without Chairman
गुहागर नगरपंचायतीच्या 5 समित्याचे सभापती आज निवडण्यात आले. यामध्ये आरोग्य व स्वच्छता समिती सभापती पदी सौ. स्नेहल रेवाळे व शिक्षण समिती सभापती पदी सौ. मनाली महेश सांगळे या नव्या चेहऱ्यांची निवड करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापती पदी सौ. वैशाली मालप यांना पुन्हा संधी मिळाली. पाणी पुरवठा समितीचे सभापती पद हे उपनगराध्यक्षांसाठी राखिव असल्याने सौ. प्रणिता साटले यांना मिळाले. खांदे पालट करताना प्रसाद बोले आणि राष्ट्रवादीच्या एकमात्र नगरसेविका सौ. सुजाता बागकर यांना अनुक्रमे स्वच्छता व आरोग्य समिती आणि शिक्षण समितीचा राजिनामा द्यावा लागला. तांत्रिक कारणांमुळे महिला व बालकल्याण समितीचे सभापती पद दुसऱ्यांदा रिक्त ठेवण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर ओढवली.

महिला व बालकल्याण समितीमध्ये सदस्य संख्या 4 असते. यामधील 2 सदस्य सत्ताधारी पक्षाचे व 2 सदस्य अन्य पक्षांचे घ्यावे लागतात. 4 सदस्यांमधील एका सदस्याची निवड सभापती म्हणून करताना 1 सूचक आणि 1 अनुमोदक द्यावा लागतो. भाजपने शहर विकास आघाडीला पाठिंबा न दिल्याने महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी आवश्यक सूचक किंवा अनुमोदक दिला नाही. त्यामुळे हे पद रिक्त राहीले. A Committee without Chairman
या निवडीचे वेळी पिठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी प्रविण पवार होते. तसेच मा. मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, प्रशासकिय अधिकारी मंगेश पेढांबकर, प्रितम वराडकर यांनी सदर निवडणूक प्रकियेमध्ये काम पाहिले
आज गठित झालेल्या विषय समित्या खालीलप्रमाणे
सार्वजनिक बांधकाम समिती
सभापती – सौ. वैशाली पराग मालप
सदस्य – सौ. नेहा नितीन सांगळे, श्री. अमोल प्रताप गोयथळे, सौ. मृणाल राजेश गोयथळे व श्री उमेश अनंत भोसले.
पाणी पुरवठा, जलनि:स्सारण नियोजन आणि विकास समिती
सभापती – सौ. प्रणिता प्रविण साटले (उपनगराध्यक्ष),
सदस्य – श्री. अमोल प्रताप गोयथळे, श्री. प्रसाद दत्ताराम बोले, श्री समिर सुधाकर घाणेकर व सौ. भाग्यलक्ष्मी महेश कानडे
स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समिती
सभापती – सौ. स्नेहल सुनिल रेवाळे,
सदस्य – श्री. प्रसाद दत्ताराम बोले, श्री. माधव तुकाराम साटले, सौ. मृणाल राजेश गोयथळे व श्री. समिर सुधाकर घाणेकर
शिक्षण समिती
सभापती – सौ. मनाली महेश सांगळे
सदस्य – सौ. सुजाता श्रीधर बागकर, सौ. स्नेहा जनार्दन भागडे, श्री. उमेश अनंत भोसले व श्री. अरुण गोविंद रहाटे
महिला व बालकल्याण समिती
सभापती – रिक्त
सदस्य – सौ. सुजाता श्रीधर बागकर, श्रीम. निलिमा सतिश गुरव, सौ. भाग्यलक्ष्मी महेश कानडे, व श्री. गजानन शंकर वेल्हाळ
स्थायी समिती
सभापती – राजेश रामचंद्र बेंडल (नगराध्यक्ष)
सदस्य – सौ. प्रणिता प्रविण साटले (उपनगराध्यक्ष), सौ. वैशाली पराग मालप, सौ. स्नेहल सुनिल रेवाळे व सौ. मनाली महेश सांगळे
2021 मधील विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडीच्या वेळी भाजपने विरोधी बाकावर बसण्याची भूमिका घेतली होती. ही भूमिका यावेळीही कायम ठेवली. A Committee without Chairman
