गुहागर, ता .08 : तालुक्यात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 8 घरांचे 5 लाख 77 हजार 770 रूपयांचे नुकसान झाले आहे. वेलदूर नवानगरमार्ग धोपावे रस्त्यावर पडलेली दरड सार्वजनिक बांधकाम विभागाने बाजुला केल्याने रस्ता पूर्ववत झाले आहे. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी तालुक्यातील विविध गावात खंडीत झालेला विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. Damage due to heavy rains

तालुक्यात गेल्या 4 दिवसात अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वित्तहानी झाली. काजुर्ली येथील मिलिंद रेवाळे यांच्या घराचे संपूर्ण छप्पर उडाल्याने 2 लाख 33 हजार 320 रूपयांचे नूकसान झाले. दत्ताराम जगताप यांच्या घराशेजारील आंबा कलमाचे 10 हजार तर घराचे पत्रे उडाल्याने रूपये 3 हजाराचे, दोडवली येथील आश्विनी जाधव यांच्या घरावर वीज पडल्याने घराचे पत्रे व दरवाजाचे 7200 रूपये, खोडदे निवातेवाडी येथील संतोष निवाते याच्या घराचे छप्पर उडून 52 हजार रूपये, खोडदे येथील सुरेश निकम यांच्या घराचे छप्पर उडून 24 हजार 700 रूपये , निगुंडळ येथील संदिप नानीसकर यांचा गोठा कोसळून 35 हजार तर सर्वाधिक शिर येथील मिलिंद गोरीवले यांच्या घरावर आब्याचे झाड कोसळूण 2 लाख 9 हजार 50 रूपयांचे नुकसान झाले. Damage due to heavy rains
