गुहागर, ता.05 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा कुटगिरी न.१ , ता. गुहागर येथे कृषिदिन उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम करण्यात आला होता. या दिवशी शालेय परिसरात १०० SK -4(सपेशल कोकण-4)या वाणाच्या हळदीच्या रोपांची लागवड करण्यात आली. Agriculture day held at Kutagiri school

मराठी शाळा कुटगिरी न.१ मध्ये घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात गुहागर पंचायत समितीतील कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी मार्गदर्शन केले. व शासनाच्या विविध कृषी योजनांची महिती दिली. शाळेमध्ये हळद लागवडीचा अनोखा उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना शेतीविषयक आवड, महत्व अधोरेखित करण्यात आले. Agriculture day held at Kutagiri school
या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष खेतले, सदस्य विजय कदम, शाळेच्या मुख्याध्यापिका ऋतुजा सोहनी, मारुती फटकरे, स्नेहा निर्मळ, श्रीम.शामल पवार उपस्थित होते. Agriculture day held at Kutagiri school

