गोगटे जोगळेकर महाविद्यालयात संस्कृत विभागातर्फे
रत्नागिरी, ता.02 : गोगटे जोगळेकर महाविद्यालयात (Gogte Joglekar College) संस्कृत विभागातर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही कालिदास दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाबरोबरच संस्कृत संभाषण वर्गाचा समारोप कार्यक्रम ही करण्यात आला. या वेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. प्रफुलदत्त कुलकर्णी, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये आणि कालिदास दिनाची वक्ता कु. ऐश्वर्या आचार्य आदी व्यासपीठावर उपस्थित होते. Kalidas Day and Closing Ceremony

कार्यक्रमाची सुरुवात संस्कृत गीतगायनाने करण्यात आली. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे स्वागत, परिचय व कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागातील प्राध्यापिका स्नेहा शिवलकर यांनी केले. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात संभाषणवर्गाचा समारोप झाला. संभाषण वर्गाच्या शिक्षिका सौ. अक्षया भागवत यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर द्वितीय वर्ष एम्.ए. च्या चैत्राली लिमये, सुखदा ताटके, प्रियांका ढोकरे यांनी मिळून एक संस्कृत संवाद सादर केला. द्वितीयवर्षात शिकण्याऱ्या केतकी मुसळे या विद्यार्थिनीने सर्वांच्या वतीने संभाषण वर्गाचा अनुभव सांगितला. तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनीनी मंगलाचरण गाऊन कालिदास दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. Kalidas Day and Closing Ceremony

या नंतर प्रा.डॉ. प्रफुलदत्त कुलकर्णी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. त्यावेळी त्यांनी संस्कृत व संस्कृतीचे जवळचे नाते सांगितले. व कालिदासाच्या इतर लेखनाचाही आढावा घेतला. संस्कृत विभागाचे सर्व कार्यक्रम आनंदात साजरे होत राहोत. यासाठी शुभेच्छा देखील दिल्या. Kalidas Day and Closing Ceremony

कालिदास दिनाचे औचित्य साधून एम. ए. ची विद्यार्थिनी कु.ऐश्वर्या आचार्य हिने “तत्रापि च चतुर्थोऽङ्कः” या कालिदास लिखित अभिज्ञान शाकुंतल या नाटकातील चौथ्या अंकावर व्याख्यान दिले. त्या मधील कालिदासाने केलेले निसर्ग वर्णन व शकुंतलेच्या पाठवणीचा प्रसंग याचे रमणीय वर्णन तसेच या अंकाचा चिकित्सक अभ्यास तिने सादर केला. Kalidas Day and Closing Ceremony उपप्राचार्य गोस्वामी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. यानंतर प्रा.जयंत अभ्यंकर यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.तेजश्री जोशी हिने केले. तसेच कार्यक्रमाला मदत करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. शांतिमंत्र म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली. Kalidas Day and Closing Ceremony

