बनावट इन्व्हॉईस टाळण्यासाठी काळजी घ्यावी – सीए केळकर
रत्नागिरी, , ता. 29 : कोणत्याही वस्तूची खरेदी-विक्री न करता फक्त इन्व्हॉईस काढणे म्हणजे बनावटगिरी आहे. सीए हे देश घडवणारे आहेत. त्यामुळे ग्राहकांची योग्य माहिती घेऊनच आपण लेखापरीक्षण करावे. बनावट (फेक) इन्व्हॉईस प्रकरणे सध्या आढळत आहे. काही ठिकाणी ऑडिटर म्हणून सीएंवरही गुन्हा दाखल केला जात आहे. यामुळे सर्व सीएंनी काळजीपूर्वक लेखापरीक्षण केले पाहिजे, असे प्रतिपादन सी. ए. इन्स्टिट्यूटच्या पश्चिम क्षेत्राचे कौन्सिल मेंबर सी. ए. अभिजित केळकर यांनी केले. वृंदावन सेमिनार हॉलमध्ये आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी सीए इन्स्टिट्यूटच्या शाखेचे अध्यक्ष प्रसाद आचरेकर व्यासपीठावर उपस्थित होते. Ratnagiri CA Institute Visit

सीए केळकर यांनी सांगितले की, रत्नागिरीला यायला नेहमीच आवडते. कोल्हापूर येथे सी. ए. इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाला आल्यानंतर मी पुढे आवर्जून रत्नागिरीला आल्याचे सीए केळकर यांनी सांगितले. दिल्ली येथे बनावट इन्व्हॉईस प्रकरणी एका सीएवर कारवाई करण्यात आली. या प्रकारची काही प्रकरणे अन्य ठिकाणीही घडली आहेत. त्यामुळे कोकणच्या सर्व सीएंनी जबाबदारीने व काळजीपूर्वक लेखापरीक्षण करावे, अशी सूचना त्यांनी केली. Ratnagiri CA Institute Visit

बनावट कागदपत्रांच्या आधारे आर्थिक उलाढाल करणाऱ्यांवर शासनातर्फे कारवाई केली जात आहे. डिजिटल क्रांतीमुळे म्हणजे पॅनकार्ड नंबर, आधारकार्ड जोडल्यामुळे सर्वांची माहिती वेगवेगळ्या माध्यमातून शासनाकडे गोळा होत असते. जीएसटी खाते काढल्यानंतर करोडो रुपयांची उलाढाल, संशयित कागदपत्रे, व्यवहार याद्वारे माहिती संकलित करून संबंधितांवर कारवाई केली जाते. एचएसएन (HSN)कोड, खरेदी, विक्री याची पडताळणी होत असते. संशयास्पद वाटल्यास विशेष टीमद्वारे चौकशी केले जाते. याकरिता १० हजार रुपये दंड असून तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. त्यामुळे आपला ग्राहक माहिती लपवू शकतो. त्यालाही अशा विषयांची माहिती द्यावी. सी. एं. नी ग्राहकाकडून केवायसी करून घ्यावी, पुरेशी खबरदारी घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली. Ratnagiri CA Institute Visit

कार्यक्रमाचे सीए शैलेश काळे यांनी सूत्रसंचालन केले. माजी अध्यक्ष सीए श्रीरंग वैद्य यांनी केळकर यांचे स्वागत केले. माजी अध्यक्ष सीए भूषण मुळ्ये यांनी सीए केळकर यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला खजिनदार सीए केदार करंबेळकर, विकासा चेअरमन सीए सौ. अभिलाषा मुळ्ये आणि सदस्य सीए शैलेश हळबे यांच्यासह रत्नागिरीतील सीए उपस्थित होते. Ratnagiri CA Institute Visit
