गुहागर, ता. 28 : वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयातील (Maharshi Parashuram College of Engineering) राष्ट्रीय सेवा योजना विभाग व क्रीडा विभागातर्फे दिनांक २० जून २०२२ ते २२ जून २०२२ असे सलग तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. Yoga Day at Velneshwar College

प्रथम दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये सामान्य योगाभ्यास याचे प्रात्यक्षिक व सराव घेण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील क्रीडा विभाग प्रमुख प्रा. श्री. औदुंबर पाटकर यांनी योगाची प्रात्यक्षिके करून दाखविली. यावेळी महाविद्यालयातील एकूण २६ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित राहून योगाची प्रात्यक्षिके केली. दुसऱ्या दिवशी देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांचे व्याख्यान म्हैसूर येथून थेट ऑनलाइन पद्धतीने प्रदर्शित करण्यात आले. व तिसऱ्या दिवशी दैनंदिन जीवनासाठी योग हे व्याख्यान व त्यानंतर प्रात्यक्षिक घेण्यात आले. Yoga Day at Velneshwar College

सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून योग शिक्षिका कुमारी केतकी जोशी लाभल्या. योग गुरु श्री. श्रीकांत ढालकर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अमित कुमार माने, राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी श्री. अरुण सरगर, क्रिडा विभाग प्रमुख श्री. औदुंबर पाटकर, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. सदरचे कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य श्री अविनाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न झाले. Yoga Day at Velneshwar College

