झी मराठीवर महाहोम मिनिस्टरच्या विजेत्या
रत्नागिरी, ता.26 : सध्या झी मराठीवर गाजत असलेल्या महा होम मिनिस्टर स्पर्धेच्या ११ लाखांच्या पैठणीच्या मानकरी रत्नागिरीच्या सौ. लक्ष्मी मंदार ढेकणे ठरल्या आहेत. त्यांनी महा मिनिस्टरच्या अंतिम फेरीत उत्तम खेळ करत विजेता होण्याचा मान पटकावला. Ratnagiri’s Lakshmi Dhekne winner

रत्नागिरीच्या लक्ष्मीला ही पैठणी मिळाल्याबद्दल रत्नागिरीकरांकडून जोरदार अभिनंदन करण्यात येत आहे. ११ लाखांच्या पैठणीचा महाराष्ट्रभर गाजावाजा होता. महाराष्ट्रभरातून विविध केंद्रांमधून निवडून आलेल्या स्पर्धकांतून अंतिम फेरीत ही अत्यंत मानाची पैठणी कोण पटकवणार? कोणत्या शहराला हा मान मिळणार याबाबत प्रचंड उत्सुकता होती. अंतिम फेरीत महा मिनिस्टरमध्ये उत्तम खेळ करत रत्नागिरीच्या सौ. लक्ष्मी ढेकणे यांनी 11 लाखांच्या पैठणीवर आपले नाव कोरले . विजेता म्हणून नाव जाहीर होताच त्यांना खूप आनंद झाला. आणि आदेश बांदेकर यांच्या हस्ते हे महावस्त्र स्वीकारतानाचा तर आनंद अवर्णनीय असल्याचे सौ. लक्ष्मी यांनी सांगितले. Ratnagiri’s Lakshmi Dhekne winner

