सरपंच सुशांत मुंडेकर ; स्पेशल कोकण -4 हळदीचे वाण
गुहागर, ता. 26 : पंचायत समिती गुहागर मार्फत आयोजित हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रमातून सुधारीत पद्धतीने व याच तालुक्यात विकसीत केलेल्या वाणाच्या हळद लागवडीतून तालुक्यातील शेतक-यांना ‘कृषी संजीवनी’ प्राप्त होईल, असा विश्वास भातगावचे सरपंच सुशांत मुंडेकर यांनी व्यक्त केला. ‘Krishi Sanjeevani’ to farmers

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य आयोजित शासनाच्या ‘कृषी संजीवनी’ सप्ताहाचा शुभारंभ पंचायत समिती गुहागर मार्फत 25 जूनला भातगाव येथे हळद लागवडीबाबत प्रात्याक्षिकातून प्रशिक्षण या कार्यक्रमातून दत्ताराम मुंडेकर व भागा मुंडेकर, यांच्या शेतावर करण्यात आला. त्यावेळी सरपंच श्री. मुंडेकर यांनी हे मत व्यक्त केले. स्पेशल कोकण -4 या हळदीच्या वाणाच्या रोपांपासून लागवड केल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. ‘Krishi Sanjeevani’ to farmers

यावेळी पंचायत समिती गुहागर कृषी अधिकारी आर.के. धायगुडे, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी हळद हे रत्नागिरी जिल्ह्यात पर्याय पिक म्हणून पुढे येत असून सुधारीत व योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्याच्या सूचना करून हळद लागवडीचे प्रात्यक्षिक दाखवले. तसेच या पिकाला लागणा-या सेंद्रिय, रासायनिक खतांबाबत सविस्तर तांत्रिक बाबींसह मार्गदर्शन केले. ‘Krishi Sanjeevani’ to farmers

यावेळी कृषी सेवक श्री. शेलार, श्री स्वामी स्वयंसहाय्यता बचत समुहाच्या सीआरपी सौ. मोहिते , अंगणवाडी सेविका पुजा घाणेकर, ग्रामसेवक सर्जेराव गोते, शेतकरी भागा मुंडेकर, दत्ताराम मुंडेकर, विठोबा वाडेकर, नामदेव वनये, विलास गादेकर, राजेंद्र मुंडेकर, रसिका घाणेकर, पल्लवी वनये, पार्वती वाडेकर, शिपाई प्रकाश गुरव व इतर शेतकरी उपस्थित होते. ‘Krishi Sanjeevani’ to farmers
