कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिराअंतर्गतनाटेकर बालकमंदिरात
रत्नागिरी, ता. 26 : एज्युकेशन सोसायटीच्या कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिराअंतर्गत कै. जयराम शंकर नाटेकर बालकमंदिरात पालकांना शिशुवाटिका शिक्षणाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. नवीन शैक्षणिक धोरण याबाबतही विद्याभारतीचे शिशुवाटिका प्रमुख सदाशिव उपाले यांनी मार्गदर्शन केले. Kindergarten education guidance

नर्सरी, छोटा गट व मोठा गट या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी हा कार्यक्रम रंजन मंदिरात झाला. श्री. उपाले यांनी पालकांच्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आसक्ती भोळे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. शाळेत देण्यात येणाऱ्या संस्कारयुक्त शिक्षणाची माहिती दिली. Kindergarten education guidance

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ सदस्या व रत्नागिरीतील सुप्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ. कल्पना मेहता उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या बालकांच्या सर्वांगीण विकासाठीच्या आवश्यक गोष्टींचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला विद्याभारती रत्नागिरी जिल्ह्याचे कार्यकर्ते शरद मुसळे, बहुसंख्य पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. निनाद तेंडुलकर यांनी केले. बालकमंदिरच्या विभाग प्रमुख श्रीमती कामिनी महाडिक यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वतीतेसाठी शाळेतील शिक्षक वृंद व सेविका यांनी मेहनत घेतली. तसेच रत्नागिरी शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, व शालेय समिती अध्यक्ष मनोज पाटणकर यांचे मार्गदर्शन लाभले. Kindergarten education guidance

