• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
23 December 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरीत गायक-वादकांचे संमेलन

by Ganesh Dhanawade
June 25, 2022
in Ratnagiri
16 0
0
Meeting of musicians in Ratnagiri
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रविवार दि. २६ रोजी सकाळी ७ वा. नावनोंदणी

रत्नागिरी, ता. 25 : विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने कलाकार रसिकांच्या भेटीला सतत येत असतात. मात्र हे सारे कलाकार एकमेकांच्या परिचित असतातच असे नाही. यासाठी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात रविवारी दि. २६ रोजी गायक-वादक कलाकार संमेलनाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील कलाकार एकत्र येणार आहेत. यावेळी सर्वांनी एकत्र यावे, ओळखी व्हाव्यात, विचारांचे आदानप्रदान व्हावे, नवनवीन संकल्पना शेअर कराव्यात, सांगितिक, वैचारिक मैफिली रंगाव्यात या हेतूने सारेजण सम्मिलित होणार आहेत. Meeting of musicians in Ratnagiri

कोरोनाच्या सावटामुळे जवळजवळ तीन वर्षांनंतर सर्व सांगितिक कलाकार एकत्र येणार असल्यामुळे त्यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात रविवारी दिवसभर हे संमेलन रंगणार आहे. सकाळी ७ वा. नावनोंदणी होईल. ९ वा. दीपप्रज्वलनाने संमेलनाला आरंभ होईल.  Meeting of musicians in Ratnagiri

प्रथम सत्रात शास्त्रीय व सुगम गायन तसेच वाद्यवादन मैफल रंगणार आहे. स्नेहभोजनानंतरच्या दुसऱ्या सत्रात ‘संगीत साधना आणि ईश्वरप्राप्ती’ या विषयावर कीर्तनातून मुलाखत होईल. कलाकारांना मनोगत व्यक्त करण्याची संधीही यानंतर मिळणार आहे. नव्या-जुन्या कलाकारांचा परिचय, काही हटके गायन, नृत्याचे कलाविष्कार, फिशपॉन्ड याशिवाय उत्स्फूर्त प्रहसनांचे सादरीकरणही या वेळी होईल. प्रेमविवाह केलेल्या कलाकार पती-पत्नींच्या खास मुलाखती हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. तसेच ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे. पसायदानानंतर स्नेहभोजनाने संमेलनाची सांगता होईल. Meeting of musicians in Ratnagiri

गेला महिनाभर संध्या सुर्वे, श्वेता जोगळेकर, गणेश रानडे, विजय रानडे, उदय गोखले, हेरंब जोगळेकर आदी रत्नागिरीतील कलाकार मंडळी या संमेलनाचे नियोजन करत असून, कलाकारांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. Meeting of musicians in Ratnagiri

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMeeting of musicians in RatnagiriNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.