वरिष्ठ अधीक्षक डाकघर, नागपूर शहर विभाग यांच्यातर्फे
नागपूर, ता. 24 : वरिष्ठ अधीक्षक डाकघर, नागपूर शहर विभाग, नागपूर यांच्याद्वारे डाक अदालतीचे आयोजन 27 जून 2022 ला सकाळी 10 वाजता वरिष्ठ अधीक्षक डाकघर नागपूर शहर यांच्या कार्यालयात करण्यात आले आहे. Postal court on 27 June

डाक सेवेबाबत तक्रार सहा आठवडयापेक्षा जास्त काळ अनुत्तरित असल्यास सदर तक्रारीचे निवारण शीघ्र होण्यासाठी तक्रारदार डाक अदालत मध्ये दाद मागू शकता. या डाक अदालत मध्ये फक्त ज्या तक्रारीचे निवारण सहा आठवड्यामध्ये झाले नाही अश्याच तक्रारीचे निवारण करण्यात येईल. तक्रारदारांनी आपले ई-मेल /पत्र के. विद्यासागर, वरिष्ठ अधीक्षक डाकघर, नागपूर शहर विभाग , नागपूर – 440001 यांच्या नावावर ई मेल द्वारा पाठवावित किवा प्रत्यक्ष संबंधित अधिकारी यांचेकडे दिलेल्या तारखेपर्यंत आणून दयावी. ई मेल आय डी donagpurcity.mh@indiapost.gov.in असून तक्रारीमध्ये तक्रार करण्या-यांनी स्वत:चे नाव आणि पत्ता तसेच फोन नंबर आणि प्रारंभी केलेल्या तक्रारी बद्दल ज्या अधिकाऱ्याकडे त्यांनी तक्रार नोंदवली असेल त्यांचे नाव आणि हुद्दा तसेच तक्रारीचे तारीख तपशील देणे. सोबत मुळ तक्रारीची छायाप्रत आणि त्या पत्र व्यवहाराची प्रत पाठवावी. प्रत्येक अर्जासोबत एकच तक्रार असावी. आपला अर्ज वरील उल्लेख केलेल्या कागद पत्रासोबत संबधित अधिकारी यांच्याकडे 24 जून 2022 पर्यंत किवा त्या अगोदर पाठवावित, असे आवाहन वरिष्ठ अधीक्षक डाकघर, नागपूर शहर विभागतर्फे करण्यात आले आहे. Postal court on 27 June

