महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान तर्फे
गुहागर, ता. 23 : महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान या सेवाभावी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून भजनी कलावंतांचा नुकताच सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रभुनाथ देवळेकर, संचालक अमोल वराडकर, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वराडकर, प्रीतम वराडकर उपस्थित होते. यांच्या हस्ते श्यामसुंदर वराडकर मंडळातील धरकरी, सह गायक कलावंत श्री. मनोहर शांताराम वराडकर, संतोष पांडूरंग वराडकर, राजेंद्र काशिनाथ वराडकर यांचा पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. Pride of Bhajani artists

मनोहर शांताराम वराडकर हे गेली पन्नास वर्ष श्यामसुंदर वराडकर मंडळाचे आधारस्तंभ सह गायक धरकरी आहेत. भजनाची त्यांना पहिल्यापासूनच आवड होती. मंडळासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. कोकणातील पारंपारिक तमाशा कला जोपासण्यासाठी सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. श्यामसुंदर वराडकर मंडळीचा बहारदार तमाशामध्ये स्त्री पात्र व सोंगे वठवलेली आहेत. Pride of Bhajani artists

श्री. संतोष पांडुरंग वराडकर गेली चाळीस वर्ष सह गायक धारकरी तमाशा कलावंत असून त्यामाध्यमातून विविध भूमिका सादर करणे. पालखी नृत्य व समा उत्सवामध्ये हिरिरीने सहभाग घेणे. एक हरहुन्नरी कलाकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सामाजिक कार्यामध्ये त्यांचे योगदान मोलाचे आहे. श्री. राजेंद्र वराडकर हे गेली पन्नास वर्ष तमाशा मध्ये स्त्री पात्रांची भूमिका सादर करत आहेत. तमाशा मध्ये सामाजिक प्रबोधनाचे विषय हाताळले आहेत. महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचा सन्मान झाल्याबद्दल सर्व स्तरातून सदर कलाकारांचे अभिनंदन होत आहे. Pride of Bhajani artists
त्यावेळी बोलताना मनोज पाटील म्हणाले की, कोकणात या लाल मातीमध्ये अभिजात प्रतिभासंपन्न तमाशा व भजनी कलावंत आहेत. यामुळेच कोकणातील लोककला जिवंत राहिले आहे. लोक प्रबोधन लोकजागृतीचे कार्य या माध्यमातून अविरत सुरू आहे. या कलाकारांचा सत्कार करताना आम्हाला अभिमान वाटतो, असे सांगितले. Pride of Bhajani artists

