गुहागर, ता. 23 : गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल भोसले यांची वर्धा जिल्ह्यात उप कार्यकारी अधिकारी पदी बढती झाली. त्यांच्या जागी नूतन गटविकास अधिकारी प्रशांत जगन्नाथ राऊत यांनी आपला पदभार स्वीकारला आहे. त्याबद्दल पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत केले. याआधी ते चिपळूण येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. Group Development Officer Raut

प्रशांत जगन्नाथ राऊत यांचे मूळगाव पाटण आहे. गेली दोन वर्षे चिपळूण पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी म्हणून उत्तमरित्या सेवा केली होती. ४ वर्षे दापोली पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी, १ वर्षे खामगाव जिल्हा बुलढाणा येथे गटविकास अधिकारी, पाटण तालुक्यात साडेतीन वर्षे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. साडेनऊ वर्षे पाटण तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा केली आहे. गुहागर पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी प्रशांत जगन्नाथ राऊत यांनी आपला पदभार स्वीकारला. त्याबद्दल पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत केले. Group Development Officer Raut

