वृक्षाचे संवर्धन करण्याची घेतली मनसे कार्यकर्त्यांनी शपथ
गुहागर, ता. 22 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुहागरच्या वतीने गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष, उद्योजक प्रमोद सिताराम गांधी व तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील रानवी, अंजनवेल, वेलदुर परिसरात ऑक्सीजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली. Plantation in Guhagar


या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, गुहागर तालुका मनसे अध्यक्ष विनोद जानवळकर, महिला तालुका अध्यक्ष सानिया ठाकुर, विभाग अध्यक्ष मयुरी शिगवण, कौंढर शाखा अध्यक्ष समीर जोयशी, विभाग अध्यक्ष तेजस पोफळे, युवा कार्यकर्ता स्वप्नील कांबळे, सचिन गडदे, विक्रम जोशी, संजोग देवकर, सुबोध कुंबटे, दिपक सुवै, राजेश यादव, संतोष पाटणकर, दैवेश घाडी, प्रवीण गांधी, सागर शिरगावकर, नितिन कारकर, विराज गांधी, सनी जैतपाल, आतिश सुर्वे, शलोक सुर्वे, रुतिक गडदे आदी उपस्थित होते. Plantation in Guhagar

