गुहागर, ता.22 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जिमखाना विभाग यांच्यावतीने “आंतरराष्ट्रीय योग दिन” संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल सावंत, योग प्रशिक्षक प्रथमेश पोमेंडकर उपस्थित होते. International Yoga Day


प्रभारी प्राचार्य डॉ.अनिल सावंत यांनी आपल्या भाषणातून भारतीयांना योगाचे महत्त्व हिंदू संस्कृती पासून, माहित असल्याचे स्पष्ट केले. आजच्या अस्थिरतेच्या काळात तंदुरूस्त राहण्यासाठी त्यांनी विद्यार्थांना सकाळी काही वेळ योग व प्राणायम करण्याचे आवाहन केले. योग प्रशिक्षक प्रथमेश पोमेंडकर यांनी सुरुवातीला सूक्ष्म व्यायाम करून योगासनाची सुरुवात केली. यामध्ये सुर्यनमस्कार, त्रिकोणासन, ताडासन, व्रजासन इत्यादी आसने करवून घेतली व त्याचे महत्त्वही पटवून दिले. यानंतर ओंकाराने प्राणायमाची सुरुवात केली. यात कपालभ्रांती,अनुलोम-विलोम व भ्रामरी प्राणायम करून घेऊन फायदे सांगितले. International Yoga Day


या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयातील जिमखाना विभाग प्रमुख डॉ. गोडसे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. अनिल हिरगोड, इतर सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्यानिमित्ताने मराठी साहित्याचा प्रसार व प्रचार करणारी “भावार्थ” ही स्वयंसेवी संस्थेचे आरोग्य, विज्ञान, निसर्ग पर्यावरण इत्यादी विविध विषयावरील ग्रंथ प्रदर्शन भरविले होते. याचाही लाभ महाविद्यालयातील विद्यार्थाबरोबर श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, गुहागरमधील शिक्षक व विद्यार्थांनी घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. युवराज पाटील यांनी केले. सौ. रश्मी आडेकर यांच्या आभार प्रदर्शनाने सांगता झाली. International Yoga Day

