चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर मुंबई विद्यापीठ
रत्नागिरी, ता.22 : चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसर मुंबई विद्यापीठात योग दिन साजरा करण्यात आला. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योगाचं मोठं महत्व आहे. भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेल्या योगाला जगभरात मोठं महत्व मिळालं आहे. याच पार्श्वभूमिवर रत्नागिरीतील उपपरिसरात देखील योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दत्तनाद योग कला केंद्राचे प्रमुख श्रीकांत ढालकर उपस्थित होते. Yoga Day celebrated in Ratnagiri

यावेळी श्रीकांत ढालकर यांनी योगासने कशी करावीत, याचं प्रात्यक्षिक करून दाखविले. मनःशांती साठी एकमेव उपाय म्हणजे योगासनं आहे. असं म्हणतात की स्वभावाला औषध नसतं, पण योग हेच त्यावरच औषध आहे. असं श्रीकांत ढालकर यावेळी म्हणाले. तर योग दिन आजच्या दिवसापूरता मर्यादित नसावा. तो रोज असावा असं यावेळी रत्नागिरी उपपरिसराचे प्रभारी संचालक डॉ किशोर सुखटणकर यांनी व्यक्त करत योग दिनाच्या कर्याक्रमाला शुभेच्छा दिल्या. Yoga Day celebrated in Ratnagiri

रत्नागिरी उपपरिसराच्या प्राध्यापक, कर्मचारी वर्ग यांना योगासनाची प्रात्याक्षिके श्रीकांत ढालकर यांनी शिकवली. ओमकार चा योग्य उच्चार, सुर्यनमस्कार, कपालभाती, वृक्षासन, त्रिकोणासन ही आसने श्रीकांत ढालकर यांनी करवून घेतली. आणि त्याचे फायदेही सांगितले. या कार्यक्रमाला उपपरिसराचे प्रभारी संचालक डॉ किशोर सुखटणकर यांच्यासह कर्मचारीवर्ग उपस्थित होते. हा कार्यक्रम उपपरिसराचे प्रभारी कुलसचीव अभिनंदन बोरगावे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचं सुत्रसंचालन साक्षी चाळके हिने केले. Yoga Day celebrated in Ratnagiri
