रत्नागिरी, ता. 22 : विवेक हॉटेल मागील देसाई बँक्वेट हॉल येथे 21 जून रोजी पतंजली योग समिती आणि परिवाराचा आठवा जागतिक योग दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमला प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, माजी नगरसेविका सौ. शिल्पाताई सुर्वे, कमलाकर तथा भाऊसाहेब देसाई उपस्थित होते. World Yoga Day by Patanjali

सुरवातीला अनंत आगाशे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी विद्यानंद जोग यांनी प्रास्ताविक केले. रत्नागिरी येथील नव्याने योगशिक्षक झालेल्या व हरिद्वार येथे अभ्यासक्रम पूर्ण करून आलेल्या योग शिक्षकांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. किसान सेवा समिती जिल्हा प्रभारी भारत सावंत व कुमारी एकता सावंत यांनी योग गीत सादर केले. World Yoga Day by Patanjali

सौ. रमाताई जोग, सौ. निता साने, निशिगंधा नवरे, श्रेया भाटकर, सौ. मोरे यांनी प्रोटोकॉलचे प्रात्यक्षिक केले. बहुसंख्येने रत्नागिरीतील योगाधक कार्यक्रमाला उपस्थित होते. वंदे मातरम म्हटल्यानंतर व दिव्य पेय देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विनय साने, अमृतलाल पटेल, राजू गोरले महिला पतंजलीच्या जिल्हा प्रभारी सुरेखाताई शिंदे, सौ. महादेवी आरबोळे, सोशल मीडिया प्रभारी समीर कुलकर्णी, श्री. तोडणकर यांनी सहकार्य केले. World Yoga Day by Patanjali


