शासन निर्णयाला प्रतिसाद; अंतिम निर्णय मुंबईकर ग्रामस्थांशी चर्चा करून
गुहागर, ता.21 : ग्रामपंचायत उमराठने विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यासाठी सकारात्मक पाऊले उचललेली आहेत. परंतु घाई न करता मुंबईकर ग्रामस्थांशी चर्चा करून लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सरपंच जनार्दन आंबेकर यांनी दिली. सोमवार दि. २० रोजी नवलाई देवीची सहाण येथे झालेल्या ग्रामपंचायत उमराठच्या विशेष ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला. Close the undesirable practice

हा सकारात्मक निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श घेऊन राज्य सरकारने सर्व ग्रामपंचायतींना विधवा प्रथेचे निर्मूलन करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसे परिपत्रक काढून त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. त्या पार्श्वभुमीवर ग्रामपंचायत उमराठच्या खास विशेष ग्रामसभेत स्थानिक ग्रामस्थांनी चर्चा करून हा सकारात्मक निर्णय घेण्याचे ठरविले आहे. सदर अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन करण्याच्या बाबतीत विशेष ग्रामसभेत सकारात्मक निर्णय घेणारी ग्रामपंचायत उमराठ बहुधा गुहागर तालुक्यातील पहिली आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दुसरी ग्रामपंचायत आहे. Close the undesirable practice

ग्रामपंचायत उमराठने समाजात प्रचलित असलेल्या ‘अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन’ या महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयाप्रमाणे उमराठमधील सर्व वाड्यांमधील ग्रामस्थांमध्ये विशेष ग्रामसभेची नोटीस आणि शासन परिपत्रक पाठवून प्रत्येक वाडीने विशेष ग्रामसभेच्या आधी प्रबोधनात्मक आपापसात चर्चा करून जनजागृती करण्यासाठी सांगितले होते. या विशेष ग्रामसभेत सरपंच जनार्दन आंबेकर यांनी ही अनिष्ट प्रथा कशी आहे. याबाबत प्रबोधन करून हि प्रथा धार्मिक आणि भावनिक जरी असली तरी परिवर्तन घडवून आणणे ही काळाची गरज आहे, हेही पटवून दिले. त्यावर ग्रामस्थांनी सखोल चर्चा करून राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षात त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने कृतीशील कार्यवाही करण्यास सर्वानुमते सकारात्मक निर्णय घेण्याचे ठरविले आहे. Close the undesirable practice

दरम्यान, या विशेष ग्रामसभेत ७/१२ वरील जागेच्या ठिकाणांची जातीवाचक नावे वगळून त्याऐवजी आवश्यक असल्यास गावातील स्थानिक भौगोलिक स्थितीशी निगडित तसेच नदी-नाल्यांशी निगडित नावे देण्याबाबत चर्चा झाली. रेन वाॅटर हार्वेस्टिंग योजना कार्यान्वित करणे (जमिनीत पाणी मुरवणे). अंगणवाडी, शाळा, सार्वजनिक ठिकाणे, सार्वजनिक पाणवठे, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या साठवण टाक्यांची स्वच्छता व हातपंप शुद्धिकरण अभियान राबविणे, शोषखड्डे अभियान, आंबा, काजू, नारळ, सुपारी, बांबू लागवड, हळद लागवड इत्यादी बाबतीत सुद्धा चर्चा झाली. Close the undesirable practice

या ग्रामसभेला ग्रामसेवक सिद्धेश्वर लेंडवे, उपसरपंच सुरज घाडे, सदस्या प्रज्ञा पवार, अर्पिता गावणंग, तंटामुक्ती अध्यक्ष संदीप गोरिवले, पोलीस पाटील वासंती आंबेकर, माजी पोलीस पाटील महादेव आंबेकर, तलाठी सुशिल परिहार, जान्हवी कांबळे, सायली हुमणे, कृषी सेवक सतिश सपकाळ, आरोग्य सेवक हळये, मुख्याध्यापक रामाणे, तसेच प्रत्येक वाडीतील वाडी प्रमुख आणि इतर प्रतिष्ठीत मंडळी तसेच प्रत्येक वाडीतील महिला मंडळी मोठय़ा प्रमाणात उपस्थित होत्या. ग्रामसभा यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्या कु. प्रज्ञा पवार, सहाय्यक नितीन गावणंग आणि ग्रामरोजगार सेवक प्रशांत कदम यांचे सहकार्य लाभले. Close the undesirable practice
