दहावीच्या परीक्षेत 100 टक्के निकाल
गुहागर, ता.19 : नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरचा इतिहासात प्रथमच 100 टक्के निकाल लागला आहे. शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक म्हणून शिवसेना युवासेना गुहागर शहर यांच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे पुष्पगुछ देऊन अभिनंदन करण्यात आले. दहावीमध्ये मोठा पट असताना शाळेतील शिक्षक यांनी मेहनत घेऊन 100 टक्के यश मिळवून दिल्याने युवासेनेच्यावतीने सर्व शिक्षकांचेही कौतुक करण्यात आले. Guhagar High School felicitated
या कार्यक्रमाला शहर संघटक श्री. विनायक जाधव, युवासेना ता. अधिकारी श्री. अमरदीप परचुरे, माजी युवासेना शहरप्रमुख तथा संस्थेचे संचलाक श्री. राकेश साखरकर, युवासेना शहरप्रमुख श्री. राज विखारे, उपशहरप्रमुख श्री. मनीष मोरे, माजी नगरसेवक श्री. प्रवीण रहाटे, वाहतूक सेना उपशहर संघटक श्री. बाबू गुहागरकर, शाखाप्रमुख श्री. कल्पेश श्री. बागकर, युवासैनिक श्रमिक भाटकर उपस्थित होते. Guhagar High School felicitated