• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

19 जून पासून पोलिओ लसीकरणाचे आयोजन

by Manoj Bavdhankar
June 19, 2022
in Health
16 0
0
Polio vaccine
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

5 वर्षांखालील सर्व मुलांचे पोलिओ लसीकरण करून घ्यावे

मुंबई, ता.19 : अकरा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 19 जूनपासून वर्ष 2022 च्या पहिल्या पोलिओ निम-राष्ट्रीय लसीकरण दिवसाचे आयोजन केले जात आहे. या अंतर्गत बिहार, चंदीगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधे पोलिओ लस दिली जाईल. आपल्या 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे पोलिओ लसीकरण करून घ्यावे असे आवाहन सर्व पालकांना करण्यात येत आहे. Polio vaccine

अभियानादरम्यान फिरत्या आणि संक्रमण पथकांद्वारे केन्द्रांवर तसेच घरोघरी जाऊन 5 वर्षांखालील सुमारे 3.9 कोटी मुलांना पोलिओ लस (ड्रॉप्स )  देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. केन्द्र सरकारने, मुलांना अतिरिक्त संरक्षण देण्यासाठी, त्याच्या नियमित लसीकरण कार्यक्रमात टोचण्यायोग्य निष्क्रिय पोलिओ विषाणू लसही आणली आहे. Polio vaccine

जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्रातील इतर 10 देशांसह भारताला 27 मार्च 2014 रोजी पोलिओमुक्त प्रमाणपत्र देण्यात  आले. देशात पोलिओचा शेवटचा रुग्ण 13 जानेवारी 2011 रोजी पश्चिम बंगालच्या हावडा येथे नोंदवला गेला. Polio vaccine

जागतिक स्तरावर, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये पोलिओ अजूनही आहे. भारताला “पोलिओमुक्त” प्रमाणित केले गेले असले तरी,  विषाणू देशाबाहेरुन येण्याचा धोका किंवा लस-व्युत्पन्न पोलिओ विषाणूचा उदय जागतिक निर्मूलन होईपर्यंत कायम आहे. उच्च लोकसंख्येची प्रतिकारशक्ती राखण्याची आणि देशातील संवेदनशील पाळत ठेवण्याची गरज ती अधोरेखित करते. Polio vaccine

Polio vaccine

सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमा अंतर्गत (युआयपी) अतिरिक्त लसींचा अंतर्भाव करून भारत आपल्या मुलांचे अधिकाधिक लस-प्रतिबंधक रोगांपासून (व्हीपीडी)  संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशात, सर्व लसी देशातील प्रत्येक मुलापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय पोलिओ कार्यक्रमांतर्गत शिकलेले धडे आणि तयार केलेली प्रणाली, नियमित लसीकरण मजबूत करण्यासाठी आणि 90% पेक्षा जास्त पूर्ण लसीकरण व्याप्ती प्राप्त करण्यासाठी वापरली जात आहे. Polio vaccine

राज्य सरकार आणि जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, रोटरी इंटरनॅशनल आणि इतर भागीदारांनी पोलिओ निर्मूलनातच नव्हे तर नियमित लसीकरण उपक्रमाचा दर्जा उंचावण्यातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. Polio vaccine

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPolio vaccineटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.