पालशेत दर्यावर्दी प्रतिष्ठान आयोजित
गुहागर, ता.19 : तालुक्यातील पालशेत येथील दर्यावर्दी प्रतिष्ठानच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे पावसाळी ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धा कोरोनाच्या कालावधीनंतर दि. 25 जून पासून सुरू होत आहेत. याचा शुभारंभ आजच दर्यावर्दी प्रतिष्ठान क्रीडानगरी मध्ये शानदार पार पडला. या स्पर्धेत एकूण 35 संघानी सहभाग घेतला आहे. Cricket tournament at Palshet

या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रक्कम 51000/- व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 25000/- व आकर्षक चषक, उत्तेजनार्थ – 2 आकर्षक चषक व रोख रक्कम, तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, सामनावीर, मालिकावीर ही पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेत अनेक नामवंत खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी क्रीडा रसिकांना मिळणार आहे. Cricket tournament at Palshet
अधिक माहितीसाठी विकास दाभोळकर ७०३०८१२६५७, निलेश पाटील- 8379959356, दिनेश जाक्कर 9420286387, साईराज दाभोळकर ७३७८४५८६९२, अपूर्व पाटील 9403470615 यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. Cricket tournament at Palshet

