नंदकुमार बेंद्रे, कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरणार
रत्नागिरी, ता.18 : राजकीय कुणबी पदाधिकारी या व्हॉट्सअप ग्रुपवर एका तरुणाने माता-भगिनीबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. संबंधित व्यक्ती विकृत असून यावर पोलिसांनी योग्य ती कडक कारवाई करावी. अन्यथा महिला भगिनी रस्त्यावर उतरतील. असा इशारा नंदकुमार बेंद्रे यांनी दिला आहे. Offensive statements about women

याबाबत माहिती देताना बेंद्रे म्हणाले की, राजकीय कुणबी पदाधिकारी ग्रुपवर वैभव वारीशे याने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे, अशा विकृतीला वेळीच लगाम घातला गेला पाहिजे. अशा विधानांमुळे एकाच धर्मातील दोन जातींमध्ये तेढ निर्माण होणार आहे. विशेष म्हणजे या ग्रुपमध्ये राजकीय पदाधिकारीसुद्धा आहेत. परंतु अशा विकृतपणे केलेल्या विधानांवर विरोधात प्रतिक्रिया व्यक्त झाल्या नाहीत. एखाद्या समाजाच्या माता-भगिनीबाबत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आणि आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल संबंधितावर कडक कारवाई होणे आवश्यक आहे, अशी मागणी आम्ही जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. Offensive statements about women

रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांना निवेदन देऊन यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन देण्याकरिता एका समाजाचे नेते नंदकुमार बेंद्रे, पंचायत समिती माजी उपसभापती विजय सालीम, माजी पंचायत समिती सदस्य सौ. स्नेहा चव्हाण, अनंत सलपे, सौ. शरयू गोताड, निकेश कळंबटे, रविंद्र भोवड, तुषार कांबळे, विशाल भारती, मदन मांडवकर, सलील डाफळे, संदेश भिसे, वैभव वाडेकर, मंदार नैकर आदी उपस्थित होते. Offensive statements about women
