सडेजांभारी देऊळवाडी येथील घटना
गुहागर, ता.16 : पोटच्या मुलाचे लग्न ठरत नसल्याने 65 वर्षीय महिलेने नैराश्येतून झाडाच्या फांदीला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुहागर तालुक्यातील सडेजांभारी देऊळवाडी येथे घडली आहे. Suicide at Sadejambhari
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सडेजांभारी देऊळवाडी येथील 65 वर्षीय भार्गिथी गोविंद आंबेकर यांच्या पोटच्या मुलाचे बरेच प्रयत्न करूनही लग्न जमत नव्हते. या नैराश्येतून भार्गिथी आंबेकर या 13 जून दुपारी 3.30 वाजल्यापासून बेपत्ता होत्या. मंगळवारी सकाळी १० वा. किंजळीच्या झाडाच्या फांदीला साडीचा गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळला. याबाबत पोलीस पाटील प्रभाकर सुर्वे यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली. भार्गिथी या त्यांचा मुलगा व मावशी यांच्यासह राहत होत्या. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे करत आहेत. Suicide at Sadejambhari
