30 जून पर्यंत अर्ज सादर करावेत ; मत्स्यव्यवसाय विभागातर्फे आवाहन
रत्नागिरी, ता.15 : मत्स्यव्यवसाय विभागामार्फत दि. 01 जुलै 2022 पासुन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन, सागरी इंजीन देखभाल व परिचालन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण सहा महिने मुदतीचे असून मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, रत्नागिरी येथे घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्हातील युवकांकडून 30 जून 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. Fisheries Training at Ratnagiri
प्रशिक्षण कालावधी 01 जुलै 2022 ते 31 डिसेंबर 2022 सहा महिन्यांचा आहे. उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष असावे. आवश्यक कागदपत्र (आधारकार्ड व रेशनकार्ड छायाप्रत जोडणे) उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक आहे. (शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत जोडणे ). क्रियाशिल मच्छिमार व किमान एक वर्ष मासेमारीचा अनुभव असावा. (विहित नमुन्यातील अर्जावर मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस घ्यावी.) प्रशिक्षण शुल्क प्रतिमाह ४५० रुपये प्रमाणे सहा महिन्यांचे २७०० रुपये आहे. दारिद्र्य रेषेखालील असल्यास प्रतिमाह १०० रुपये प्रमाणे सहा महिन्यांचे ६०० रुपये प्रशिक्षण शुल्क आहे. (दारिद्र रेषेखालील असल्यास ग्रामसेवक/ गटविकास अधिकारी पं. स. यांचा दाखला जोडावा.) Fisheries Training at Ratnagiri
राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) अंतर्गत योजनेतून अर्थसहाय्य घेवून मच्छिमारी स्वयंरोजगाराच्या नौका बांधता येतील. सागरी नौकांवर पात्रतेनुसार खलाशी म्हणून रोजगाराच्या संधी उपलब्ध होवू शकते. Fisheries Training at Ratnagiri
अधिक माहितीसाठी
रत्नाकर प्रभाकर राजम, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, पेठकिल्ला, ता. जि. रत्नागिरी पिन – ४१५६१२. ईमेल: ftcrtn@gmail.com मोबाईल व WhatsApp क्रमांक- 9421264438 येथे संपर्क साधावा.
तरी इच्छुक युवकांनी या प्रशिक्षण केंद्राशी किंवा मोबाईल व WhatsApp क्रमांक 9921330300 वर संपर्क साधल्यास विहीत नमुन्यातील अर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल. अर्ज स्वतःचे हस्ताक्षरात भरुन द्यायचा आहे. त्यावर मच्छिमार संस्थेची शिफारस घेऊन 30 जून 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत कामकाजाचे दिवशी वर नमुद WhatsApp किंवा ईमेल वर सादर करावेत, असे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, रत्नागिरी यांनी कळविले आहे. Fisheries Training at Ratnagiri
