हरियाणा येथील खेलो इंडिया युथ गेम्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत आठवा क्रमांक
दाभोळ, ता.14 : प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुल, विलेपार्ले येथे प्रशिक्षण घेणारी इशिता सुनिल रेवाळे. हिने नुकत्याच पार पडलेल्या हरियाणा येथील खेलो इंडिया युथ गेम्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत फ्लोअर एक्सरसाईज या क्रिडा प्रकारात रौप्य पदक मिळवले. रेवाळे हिने वैयक्तीक आठवा क्रमांक मिळवत मुलींच्या महाराष्ट्र संघाला विजेतेपदाचा चषक मिळवण्यास हातभार लावला. Silver medal for Ishita Rewale
इशिता सुनिल रेवाळे हिने कठीण आर्थिक परिस्थितीत व वडिलांचे अथक परिश्रमामुळे हे यश मिळाले. त्याचबरोबर श्री. अरविंद प्रभू (अध्यक्ष), डॉ. मोहन राणे (सचिव), नीलम बाबरदेसाई (जिम्नॅस्टिक्स विभाग प्रमुख) यांच्या पाठिंब्यामुळे आणि प्रशिक्षक विशाल कटकदौंड व पूर्व प्रशिक्षक हरीष परब, विदेश दबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली यश मिळवल्या बद्दल इशिता हिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. Silver medal for Ishita Rewale
