जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांचा लेख : २५ नवीन एम्स हॉस्पिटल
रत्नागिरी
सन २०१४ मध्ये भा.ज.पा.प्रणीत केंद्र शासन दिल्लीमध्ये स्थानापन्न झाले. पहिली ५ वर्ष उत्तम काम केल्याने हिंदुस्तानमधील जनतेचा संपूर्ण विश्वास प्राप्त करत २०१९ मध्ये ३०० पेक्षा जास्त खासदारांचे बळ देऊन नरेंद्र मोदी यांना भारतीय मतदारांनी घवघवीत यश देऊन परत दिल्लीमध्ये पाठवले. गेल्या आठ वर्षांचा आढावा घेणारा भाजपा दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांचा लेख. Modi government
८ वर्षाचा कालावधी नरेंद्रजी मोदी देशाचे नेतृत्व करीत आहेत. हा ८ वर्षाचा कालावधी सुशासन पर्व स्वरूपाचा म्हणून भा.ज.पा. साजरा करीत आहे. प्रधान सेवक असणारे पंतप्रधान संसदेत प्रथमच प्रवेश करताना संसदेच्या पायरीवर नतमस्तक झालेले मोदीजी, आपले सरकार गोरगरीब जनतेसाठी काम करेल असं सुरुवातीलाच स्पष्ट करणारे मोदीजी, मी प्रधान सेवक आहे अशी संकल्पना सर्वार्थाने रूढ करणारे मोदीजी व त्यांचे सरकार गेली ८ वर्ष अंत्योदयाचे सूत्र नजरेसमोर ठेवून काम करत आहे. Modi government
स्वच्छ भारत अभियानाला जनमानसात स्विकारार्ह करण्याचे उद्गगाते म्हणून मोदीजींनी भरीव काम केले. जनधन खात्याच्या माध्यमातून तळागाळातील जनतेला बँकींग व्यवस्थेशी जोडत गेल्या. ८ वर्षात या जनधन खात्यांचा उपयोग लाभार्थींना थेट मदत प्राप्त करून देण्याची किमया मोदीजींनी साधली आहे. या देशातील प्रत्येक नागरिकाला पतदार बनवण्यासाठी राजमार्ग म्हणून जनधन खात्याची चळवळ दूरगामी बदल घडवणारा आहे. Modi government
आयुष्यमान भारत, शेतकरी सन्मान (Farmers Honors), मोफत रेशन(Free Ration), उज्वला गॅस (Ujwala Gas), प्रधानमंत्री आवास, शहरी भागात प्रथम घर अथवा फ्लॅट घेणाऱ्या नागरिकाला भरीव व्याज सवलत, अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana), मातृवंदना योजना( Matruvandana Yojana), सर्व नागरिकांसाठी दोन कोरोना लसी मोफत पुरवठा, डिजिटल लॉकर सारखी सुविधा शासनामार्फत पुरविण्याची अभिनव संकल्पना, आत्मनिर्भर भारताचा संकल्प करत तो साध्य करण्यासाठी भरपूर प्रभावी योजना अशा अनेक जनहिताच्या योजना प्रभावी पद्धतीने नरेंद्रजी मोदी शासनाने गेल्या ८ वर्षात राबवल्या. अंत्योदयाच तत्वज्ञान हे सत्तेत आल्यानंतरही भा.ज.पा विसरला नाही. हे विविध योजनांचा मागोवा घेतला की स्पष्ट होते. Modi government
भारत देशाच्या जागतिक स्तरावरील प्रतिमेला अधिक बलवान करण्यात मोदी शासनाला कमालीचे यश आले आहे. भारत देशाची शक्तिमान प्रतिमा सर्व जगासमोर आणतानाच मित्र राष्ट्राबरोबर असणारे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणारे निर्णय मोदीजींनी घेतलेले आपण अनुभवत आहोत. अयोध्येतील प्रभू रामचंद्राचे भव्य मंदिर निर्माण कार्यासाठी अत्यंत जागृत राहत मंदिर निर्मितीच्या कामाने आता वेग घेतला आहे. पुढील दोन वर्षात प्रभू रामचंद्राचे मंदिर कोट्यावधी हिंदुस्तान मधील नागरिकांच्या इच्छेची पूर्तता करीत उभे राहील. मंदिर निर्मितीचा आपला वादा भा.ज.पा सरकारने पूर्ण केला याचे समाधान संपूर्ण देशात पाहायला मिळते. Modi government
देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी स्वदेशी उत्पादनाला चालना देण्याचे धोरण मोदी शासनाने अवलंबले. त्याचप्रमाणे निर्यात वाढवत एक अत्यंत प्रभावी यश केंद्र शासनाने साध्य केले. कोरोना संकटात अत्यंत धैर्याने वाटचाल करत लस निर्मिती बरोबरच सर्व नागरिकांपर्यंत लस पोचवण्यात नरेंद्रजी मोदी शासन यशस्वी ठरले. आरोग्य सुविधांचे जाळे निर्माण करण्यासाठी हरसंभव व्यवस्था उभी राहिलेली देशवासीयांनी अनुभवली. मोदींच्या ८ वर्षातील कार्यकाळात २५ नवीन एम्स हॉस्पिटल उभी राहिली. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे काम मोदी शासन करताना आपण पाहत आहोत. देशातील गोरगरीब नागरिकाला आरोग्य सुविधा पोहोचवण्याचा हा संकल्प करून राबवलेली धोरणे जनमानसात सर्वदूर अभिनंदनास पात्र ठरली आहेत. Modi government
रस्तेबांधणी, विमानतळ उभारणी, मेट्रो रेल्वे निर्मिती, इलेक्ट्रिकल वाहनांचा उपयोग यासारखे अनेक निर्णय मोदी शासनाने अंमलात आणून विकासाला गती दिली. ज्या मुळ मुद्द्यांचा पाठपुरावा करण्यासाठी जनसंघाने काम केले. ते घटनेतील ३७० कलम रद्द करत काश्मीरला असलेला स्वतंत्र दर्जा मोदींजीच्या शासनाने धैर्यवान निर्णय करत रद्द केला. काश्मीरला हिंदुस्थानमध्ये पूर्णांशाने समाविष्ट करून घेणारा हा निर्णय देशवासीयांच्या मनात मोदींजी व त्यांचे शासन या बद्दल आदर वाढवून गेला. Modi government
परकीय हिंदू, शिख, जैन ह्या त्या त्या ठिकाणी अल्पसंख्यांक ठरणार्या नागरिकांना नागरिकत्व कायद्याचे माध्यमातून नागरिकत्व बहाल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या ८ वर्षाच्या कार्यकाळात आपण अनुभवला. सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तांनच्या कारवायांना कणखर आक्रमक उत्तर मोदींच्या नेतृत्वाखाली दिल्याने संपूर्ण भारतीय जनमानस आश्वस्त झालेले आपण अनुभवले. Modi government
मन कि बात च्या माध्यमातून न चूकता देशबांधवाबरोबर कनेक्ट रहाण्याची कमिटमेंट सातत्याने पाळणारे मोदीजी आपण ८ वर्षात अनुभवले. “वन रँक वन पेंशन” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची कमिटमेंट मोदी शासनाने पाळली. भारतीय लष्कर ताकदवान बनवण्यासाठी उचित योजना तयार करत तीनही सैन्य दलांना भक्कम बनवण्याचे काम मोदीजींच्या नेतृत्वाखालील शासनाने सातत्याने केले. भारतीय सांस्कृतिक परंपरेचं प्रतीक असलेला योगा जागतिक स्थरावर अधोरेखित केला. Modi government
२१ जून हा योग दिवस म्हणून साजरा करण्याची कल्पना मोदीजींनी जगाला स्विकारायला लावली. गेल्या ८ वर्षात मोदीजींच्या नेतृत्वाखालील बलशाली भारत अनुभवत असताना गेल्या ८ वर्षात झालेल्या बहुतांशी निवडणुका भा.ज.पा.ने जिंकल्या व जनमानस मोदी शासनावर खुश आहे, याची पोचपावती प्राप्त केली. कर्तव्यदक्ष, सदैव सक्रिय, कर्तव्य कठोर रहात देशहितासाठी १००% योगदान देण्याची मोदीजींची कमिटमेंट त्याचबरोबर गेल्या ८ वर्षात मोदी शासनातल्या एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लागला नाही. अलीकडच्या इतिहासातील ही अपवादात्मक गोष्ट मोदी शासनाने ८ वर्ष भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देत रूढ केली. Modi government
मोदीजींच्या नेतृत्वाखाली गेली ८ वर्ष ही सुशासनाचे उत्तम उदाहरण आहे. हे सुशासन पर्व म्हणून साजरे करताना जनमानसात मोदीजींबद्दल आदर, विश्वास, भक्ती ओतप्रत भरलेली अनुभवताना भा.ज.पा. कार्यकर्ता म्हणून समाधान होते. Modi government