• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वाळुंच्या कणांवरुन सापडला चोर

by Mayuresh Patnakar
June 11, 2022
in Guhagar
17 0
1
Thief arrested in 10 minutes
33
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अवघ्या 10 मिनिटात पोलीसांनी केले जेरबंद

गुहागर, ता.11 : फ्लॅटमध्ये सापडलेल्या वाळुंच्या कणांवरुन अवघ्या 10 मिनिटात पोलीस चोरापर्यंत पोचले. सुरवातीला आरोपी गुन्हा कबुल करत नव्हता. मात्र पोलीसी खाक्या दाखविल्यावर या चोराने लपवलेला मालही पोलीसांच्या ताब्यात दिला. पोलीसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. हे नाट्य शुक्रवारी (ता. 10) शृंगारतळीत घडले.

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी रोशन मोहल्ला येथील स्टारसिटी बिल्डींगमध्ये तिसऱ्या मजल्यावर कुलसुंबी मुनाफ शिरगावंकर (वय 40) यांचे कुटुंब रहाते. या बिल्डींगमध्ये गेले तीन चार दिवस बशीर समसुद्दीन गोटे, मुळ गाव वाघिवरे तांबेवाडी, ता. चिपळूण हा आपल्या नातेवाईकांकडे रहाण्यासाठी आला होता. त्याला शृंगारतळीमध्ये काम मिळाले होते. शुक्रवारी (ता. 10) कुलसुंबी शिरगावकर घरात एकट्या असल्याचे लक्षात आल्यावर बशीरने त्यांच्या सदनिकेत शिरुन कुलसुंबी यांची पर्स चोरली. आपल्या घरात कोणीतरी येवून गेल्याची चाहुल कुलसुंबी यांना लागली. परंतु त्यांना कोणीच दिसले नाही. घरातील कोणती वस्तू चोरीला गेली का असा संशय येवून त्यांनी घराची पहाणी केली. त्यावेळी आपली पर्स जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तातडीने कुलसुंबी यांनी घडला प्रकार पोलीसांना सांगितला. Thief arrested in 10 minutes

Thief arrested in 10 minutes

शृंगारतळीत कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल वैभव ओहोळ, प्रितेश रहाटे यांनी कुलसुंबी यांच्याघरी जावून पहाणी केली.  स्टारसिटीमध्ये रहाणाऱ्या कुटुंबांची माहिती घेतली. त्यावेळी काही दिवसांपूर्वीच इमारतीमध्ये रहाण्यास आलेल्या बशीर गोटेबद्दल त्यांना संशय आला. बशीरला बोलावून त्यांची चौकशी केली. मात्र बशीरने चोरीचे कृत्य केल्याचे नाकारले. म्हणून बशीरला घेवून पोलीस पुन्हा कुलसुंबी यांच्या घरी गेले आणि सदनिकेत पर्स ठेवलेल्या ठिकाणापर्यंत पडलेले वाळुचे कण आणि पायांचे ठसे दाखवले. त्यांच्या पायावरील वाळुशी या कणांचे साम्य असल्याचे दाखवून दिले. तरीही बशीर चोरी केल्याचे नाकारत होता. मग मात्र पोलीसांनी आपला खाक्या दाखवला. अखेर बशीरने चोरलेली पर्स त्यातील 1 हजार रुपयांसह पोलीसांच्या ताब्यात दिली. Thief arrested in 10 minutes

या घटनेचा गुन्हा गुहागर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. त्यावेळी बशीर गोटे हा सराईत चोर असून चिपळूण पोलीस ठाण्यात त्याच्यावर 2006 आणि 2017 मध्ये दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. कुलसुंबी यांनी पोलीसांना चोरीची माहिती दिल्यानंतर अवघ्या 10 मिनिटात पोलीसांनी चोर पकडला. याबद्दल गुहागर पोलीसांचे कौतुक होत आहे. Thief arrested in 10 minutes

Tags: CrimeGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarThief arrested in 10 minutesटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.