पंचायत समिती गुहागर मार्फत हळद प्रकल्प यशस्वी
गुहागर, ता.11 : आम्ही गेली 20 वर्ष या भागासाठी हळद लागवडीबाबत विकसीत तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. पंचायत समिती गुहागरचा हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण प्रकल्प यशस्वी होऊ शकेल, असा विश्वास हळदीच्या एस. के-4 वाणाचे प्रणेते व प्रगतीशील शेतकरी सचिन कारेकर यांनी व्यक्त केला. मळण येथील मनोहर साळवी यांच्या शेतावर ‘प्रात्याक्षिकातून प्रशिक्षण’ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. Turmeric project successful


यावेळी कृषी अधिकारी आर. के. धायगुडे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंचायत समिती गुहागर मार्फत हळद रोपे खरेदीवर 75% अनुदान उपलब्ध होण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले आहे. Turmeric project successful
प्रात्याक्षिकातून प्रशिक्षण कार्यक्रमात हळकुंडापासून रोपे लागवड करण्याचे फायदे, लागवडीचे अंतर, हळद पिकासाठी लागणारी सेंद्रिय खते व जोडीला रासायनिक खते त्याचबरोबर किड- रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याबाबत घेण्यात येणारी काळजी इत्यादि बाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी केले. त्याचबरोबर हळकुंडापासून लागवडीबाबतही माहिती देण्यात आली. Turmeric project successful
यावेळी मळणचे सरपंच नारायण गुरव, पालपेणेचे उप सरपंच रघुनाथ घाणेकर, ग्रामसेवक बाबू रायकर, मनोहर साळवी, सी.आर.पी. मानसी दवंडे, उज्वला महाडीक, निर्मला तटकरे, सडेजांभारी मुनावर घारे, पालपेणेचे सोसायटीचे सचिव विनायक घाणेकर, पांडुरंग आग्रे, श्वेता शिंदे, क्षितीज शिंदे, प्रेरणा सकपाळ, प्रगतीशील शेतकरी अविनाश माने तालुक्यातील शेतकरी व बचत समुहातील महिलावर्ग उपस्थित होते. Turmeric project successful