केंद्रीय पृथ्वीविज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांची घोषणा
दिल्ली, ता.10 : 2023 मध्ये ‘गगनयान’ ही पहिली मानवी अंतराळ मोहीम भारत यशस्वी करेल. तत्पूर्वी 2022 अखेरीस इस्रोने (ISRO) तयार केलेला ‘व्योममित्र’ नावाचा अवकाशाला घाबरणारा यंत्रमानव (Robot) अंतराळ मोहिमेत सहभागी होईल. असे प्रतिपादन केंद्रीय पृथ्वीविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) डॉ. जितेंद्र सिंग यांनी केले. ते दिल्लीत एका समारंभात बोलत होते. Gaganyan Mission
भारताने अंतराळ संशोधनात गेल्या काही वर्षात भरारी घेतली आहे. भारताच्या मंगळयान मोहिमेचे (Mangalyaan mission) जगभरात कौतुक झाले होते. भारताने चांद्रयान मोहिम (Chandrayaan mission) 1 आणि 2 यशस्वी केली. याशिवाय जगभरातील विविध देशांचे उपग्रह (Satellite) अंतराळात सोडण्याचा उपक्रम भारत करत आहे. या पार्श्वभुमिवर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी केलेले प्रतिपादन महत्वपूर्ण ठरते. Gaganyan Mission
दिल्लीत एका समारंभात बोलताना केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग की, अंतराळ मोहीमेच्या चाचण्या आता प्रगत टप्प्यावर असून गगनयान ही मोहीम 2023 च्या उत्तरार्धात केली जाण्याची शक्यता आहे. गगनयान ही पहिली मानवी अंतराळ मोहीम यशस्वी करण्यासाठी काही महत्वाच्या मोहिमा यावर्षी होणार आहेत. यानातील व्यक्तींना संकटकाळी बाहेर पडू देणाऱ्या प्रणालीची चाचणी आणि गगनयानची पहिली मानवविरहित मोहीम (जी-1) या दोन्ही मोहिमा 2022 च्या उत्तरार्धात होणार आहेत. त्यानंतर 2022 च्या अखेरीस दुसरी मानवविरहित मोहीम काढली जाईल. त्यामध्ये इस्रोने तयार केलेला ‘व्योममित्र’ नावाचा अवकाशाला घाबरणारा यंत्रमानव प्रवास करेल. आणि त्यानंतर 2023 मध्ये गगनयान ची पहिली मानवी अंतराळ मोहीम काढण्यात येईल. Gaganyan Missionhttps://guhagarnews.com/