सुर्वे- शेटे पॅनेलची एकहाती सत्ता, गुहागरमधील तिघे विजयी
गुहागर, ता.10 : १८९० साली रावबहादूर सी के बोले यांनी भंडारी समाजाच्या ऐक्यासाठी स्थापन केलेल्या कित्ते भंडारी ( Kitte Bhandari ) ऐक्य वर्धक मंडळी दादर मुंबई या संस्थेची 16 वर्षांनी न्यायालयाच्या आदेशाने रविवार, दिनांक 5 जून 2022 रोजी सभासद निवडणूक पार पडली. या निवडणूकीत सुर्वे शेटे पॅनलने बोले पॅनलचा पराभव केला. गुहागरसाठी कौतुकाची बाब म्हणजे या निवडणुकीत गुहागरच्या भंडारी समाजाचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित भरत शेटे कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी या संस्थेच्या अध्यक्षपदी निवडून आले. तर संचालक म्हणून गुहागरमधील हॉटेल किस्मतचे मालक अशोक पडवळ आणि आरेगावाचे मुळनिवासी दिपक तवसाळकर हे निवडून आले आहेत. Kitte Bhandari President Bharat Shete
लोकहितवादी रावबहादूर सीताराम केशव बोले यांनी भंडारी समाजाच्या ऐक्यासाठी १८९० साली कित्ते भंडारी ( Kitte Bhandari ) ऐक्यवर्धक मंडळी ही संस्था सुरु केली. या संस्थेचे मुख्यालय मुंबईत दादर येथे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या या संस्थेला आता 131 वर्ष झाली आहेत. संस्थेतर्फे मुंबईमध्ये अनेक उपक्रम राबविले जातात. भंडारी समाजामधील विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या समाजबंधुंना जोडून ठेवण्याचे काम ही संस्था करते. त्यामुळे सर्वच समाजांसाठी अभिमान असलेली, आधार असलेली संस्था अशी या संस्थेची ख्याती आहे. Kitte Bhandari President Bharat Shete
2006 मध्ये संस्थेच्या झालेल्या निवडणुकीत वसंतराव सुर्वे यांनी बोले पॅनेलचा दारुण पराभव केला होता. परंतु रावबहादुर बोले यांचे नातू आणि सहकाऱ्यांनी सुर्वे पॅनेलच्या निवडून आलेल्या मंडळींकडे संस्थेचा कारभार दिलाच नाही. 2006 ते 2022 या 16 वर्षांच्या कालावधीतील संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली नाही. वार्षिक आर्थिकपत्रके सर्व सभासदांपर्यंत पोचविली नाहीत. त्यामुळे विश्र्वस्त, संचालक मंडळ या सर्वांविरोधात सभासदांमध्ये नाराजी होती. काही सभासदांनी याविषयी न्यायालयात दाद मागितली. त्यामुळे 2022 मध्ये न्यायालयाच्या आदेशाने कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी या संस्थेची निवडणूक घेतली गेली. Kitte Bhandari President Bharat Shete
ही निवडणूक रविवार, दि. 5 जून 2022 रोजी झाली. या निवडणुकीत रावबहादुर बोले पॅनेल आणि सुर्वे शेटे पॅनेल अशा दोन पॅनेलचे मिळून सुमारे 56 उमेदवार होते. 5 विश्र्वस्त, 1 अध्यक्ष, 2 उपाध्यक्ष आणि 21 संचालक अशा 29 जागांकरीता 56 उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे एक मतपत्रिका सहा पानांची होती. या ऐतिहासिक निवडणुकीसाठी कोकण आणि गोव्यातील अनेक सभासद रविवारी मुंबईत दाखल झाले होते. रविवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत झालेल्या मतदानामध्ये संस्थेच्या 729 सभासदांनी मतदान केले. Kitte Bhandari President Bharat Shete
रविवारी सायंकाळी मतदानाची वेळ संपल्यानंतर सायंकाळी 7.00 वा. मतमोजणीला सुरवात झाली. ही मतमोजणी सोमवारी सायंकाळी 7.30 वा. संपली. संपूर्ण निकाल जाहीर होण्यास सोमवारी रात्री 11 वाजले. तोपर्यंत कोकणातील अनेक लोक मतमोजणी मंडपात थांबले होते. या निवडणुकीत बोले पॅनेलचा दारुण पराभव झाला. Kitte Bhandari President Bharat Shete
सुर्वे शेटे पॅनेलचे विजयी उमेदवार खालीलप्रमाणे
विश्र्वस्त (5)
श्री. विजय दत्ताराम साखरकर
श्री. मधुकर रामचंद्र तोडणकर
श्री. दिपक यशवंत तवसाळकर
श्री. विलास मधुकर सुर्वे
श्री. नविनचंद्र भालचंद्र बांदिवडेकर
अध्यक्ष
श्री. भरत वासुदेव शेटे
उपाध्यक्ष (2)
श्री. संजय सदानंद गुढेकर
श्री. आनंद बाबुराव मयेकर
व्यवस्थापक समिती (21)
श्री. संतोष बाबुराव मांजरेकर
श्री. सुर्यकांत कृष्णा बिर्जे
श्री. संजय शंकर भटणकर
श्रीमती अक्षता अनंत कीर
श्री. प्रभाकर हरिश्चंद्र पोलेकर
श्री. शेखर गणपत कीर
श्री. अशोक परशुराम पडवळ
श्री. अरविंद रामकृष्ण सुर्वे
श्री. प्रकाश बाळकृष्ण बागकर
श्री. प्रमोद अनंत चव्हाण
श्री. संजय आत्माराम पाटील
श्री. भुपेंद्र सुरेश देवकर
श्री. पंकज प्रभाकर मोरे
श्री. मुरलीधर मदन मोरे
श्री. राजेंद्र एकनाथ पाटील
श्री. शशिकांत भिकाजी तोडणकर
श्री. अनिल शंकर बागकर
श्री. दत्तात्रय गणपत सुर्वे
श्री. विकास विष्णू बागकर
श्री. श्रीधर यशवंत शिरधनकर
श्री. सुनिल धनाजी मोरे सुर्वे शेटे पॅनेलच्या विजयानंतर निवडून आलेले संचालक मंडळाने आणि त्यांच्या हितचिंतकांनी सर्वांचे अभिनंदन केले. कोकणातील अनेक गावांमधुन अभिनंदनाचे फोन विजयी उमेदवारांना येऊ लागले. लोकहितवादी रावबहादुर बोले यांनी सुरु केलेल्या संस्थेचा कारभार सर्वांना विश्र्वासात घेवून चालविला जाईल अशी ग्वाही नव्या संचालक मंडळाने यावेळी दिली. Kitte Bhandari President Bharat Shete