असगोली गावाला जिल्हा परिषद गटाचा मान
गुहागर, ता. 02 : गुहागर नगरपंचायतमधुन बाहेर पडून नव्याने स्थापन झालेली असगोली ग्रामपंचायत गेली तीन वर्ष कोणत्याच गण व गटात सहभागी नव्हती. मात्र नव्या नव्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण रचनेत थेट जिल्हा परिषद गटाचा मान मिळाला आहे. पूर्वी गुहागर तालुक्यात 4 गट व 8 गण होते. आता नव्या रचनेमध्ये १ गट व 2 पंचायत समिती गण वाढले आहेत. (ZP PS New Arrangement)
ZP PS New Arrangement
गुहागर तालुक्यातील पहिला जिल्हा परिषद गट 28 असगोली हा आहे. या गटात 55 अंजनवेल आणि 56 असगोली असे दोन पंचायत समिती गण आहेत. 55 अंजनवेल पंचायत समिती गणामध्ये साखरी त्रिशुळ, पालकोट त्रिशुळ, साखरी बुद्रुक, रानवी, अंजनवेल, वेलदूर आणि धोपावे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर 56 असगोली पंचायत समिती गणात पेवे, खामशेत, पालपेणे, आरे, वरवेली आणि असगोली या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. (ZP PS New Arrangement)
गुहागर तालुक्याची मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या शृंगारतळी गावाला यावेळी जिल्हा परिषद गटाचा मान मिळाला आहे. 29 शृंगारतळी जिल्हा परिषद गटात 57 तळवली (अंतर्भुत ग्रामपंचायती – कारुळ, विसापूर, पांगारी तर्फे हवेली, परचुरी, वडद, तळवली, मुंढर, गिमवी, झोंबडी) आणि 58 शृंगारतळी (अंतर्भुत ग्रामपंचायती – निगुंडळ, चिखली, जानवळे, पाटपन्हाळे) असे दोन पंचायत समिती गण आहेत. (ZP PS New Arrangement)
कोंडकारुळ जिल्हा परिषद गटात 59 मळण आणि 60 कोंडकारुळ असे दोन पंचायत समिती गण आहेत. 59 मळण पंचायत समिती गणात कौंढरकाळसूर, मढाळ, सुरळ, पांगारी तर्फे वेळंब, जामसुद व पोमेंडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर 60 कोंढकारुळ पंचायत समिती गणात पालशेत, अडूर आणि कोंडकारुळ या ग्रामपंचायतींचा समावेळ आहे. (ZP PS New Arrangement)
31 वेळणेश्र्वर जिल्हा परिषद गटात 61 वेळणेश्र्वर आणि 62 शिर या पंचायत समिती गणांचा समावेश आहे. यातील 61 वेळणेश्र्वर गणात वेळणेश्र्वर, साखरीआगर, उमराठ, हेदवी आणि नरवण या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर 62 शिर गणात कोतळूक, पाली, कुटगिरी, पाभरे, शिर, मासु, चिंद्रावळे आणि पिंपर या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. (ZP PS New Arrangement)
32 पडवे जिल्हा परिषद गटात 63 पडवे व 64 पाचेरी सडा या दोन पंचायत समिती गण आहेत. 63 पडवे गणात आबलोली, जांभारी, कुडली, काताळे आणि पडवे ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर 64 पाचेरी सडा गणात खोडदे, आवरे असोरे, शिवणे, काजुर्ली, कोसबीवाडी, भातगांव, गोळेवाडी, कोळवली, पाचेरी सडा, पाचेरी आगर व आंबेरे खुर्द ग्रामपंचायतींचा समावेश आहे. (ZP PS New Arrangement)
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील गट व गणांची रचना आज जाहीर झाली. या रचनेबाबत लोकांच्या काही हरकती असतील त्यांनी त्या हरकती आपल्या म्हणण्यासह उपविभागीय अधिकारी चिपळूण (प्रांत) यांच्याकडे 8 जून 2022 पर्यंत लेखी सादर करायच्या आहेत.