चंदगड तालुक्यातील ११ तरुणांना मारहाण करून केले होते ब्लॅकमेल
चंदगड, ता.01 : गोव्यात फिरायला गेलेल्या चंदगडच्या तरुणांना मारहाण आणि ब्लॅकमेल करून लुटणाऱ्या तिघा आरोपींना पकडण्यात अखेर म्हापसा पोलिसांना यश आले आहे. सचिन भारद्वाज, आशिष सिंग (दोघेही हरयाणा) व मुबारक मुल्ला (तामिळनाडू) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. Success to Mhapsa police

मिळालेल्या माहितीनुसार, चंदगड तालुक्यातील ११ तरुणांना पर्यटनाच्या नावाखाली ब्लॅकमेल आणि मारहाण करून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार दोन दिवसापूर्वी घडला होता. तसेच या तरुणांचे नग्न व्हिडिओ करून ब्लॅकमेल केल्याने हे तरुण प्रचंड दडपणाखाली होते. त्यांनी अखेर चंदगड पोलिसांकडे संरक्षणाची मागणी करून रविवारी (दि. २९ मे रोजी) म्हापसा पोलिसात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत होता. Success to Mhapsa police
दरम्यान, म्हापसा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आज तिघांना अटक केली. संबंधित हॉटेल आणि परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि चौकशीतून ही कारवाई केली आहे. या कारवाईत सचिन भारद्वाज, आशिष सिंग (दोघेही हरयाणा) व मुबारक मुल्ला (तामिळनाडू) यांना अटक केली आहे. Success to Mhapsa police
