• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
23 December 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वीज बिल थकबाकीदारांवर कारवाई

by Guhagar News
June 1, 2022
in Ratnagiri
16 0
0
Action on electricity bill arrears
32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कोकण विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांचे निर्देश

रत्नागिरी, ता. 01 : ग्राहकसेवेचा डोलारा सांभाळणाऱ्या महावितरणची आर्थिक भिस्त ग्राहकांकडून दरमहा वसूल होणाऱ्या वीज बिलांच्या महसुलावर अवलंबून आहे. तेव्हा वापरलेल्या वीज सेवेचे मोल ग्राहकांनी नियमित व मुदतीत अदा करणे आवश्यक आहे. तरी थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करून वीजग्राहकांनी सहकार्य करावे, अन्यथा थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, असे आवाहन निर्देश महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिले आहे. Action on electricity bill arrears

रत्नागिरी परिमंडल कार्यालयात रत्नागिरी व सिंधुदुर्ग मंडलातील सर्व कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता यांची आढावा बैठक शुक्रवारी (२७ मे) संपन्न झाली. त्यावेळी श्री. डांगे बोलत होते. बैठक प्रसंगी रत्नागिरी परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. विजय भटकर, अधीक्षक अभियंता श्री.माणिकचंद लवटे, अधीक्षक अभियंता श्री.विनोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. Action on electricity bill arrears

आढावा बैठकीदरम्यान सहव्यवस्थापकीय संचालक श्री. डांगे म्हणाले की, महावितरणचा कारभार ‘ना नफा, ना तोटा’ तत्वावर चालतो. आपल्या ग्राहकांना वीजसेवा देण्यासाठी महावितरणही एका ग्राहकाच्या भूमिकेत आहे. महावितरणला ग्राहकांना वीज पुरविण्यासाठी निर्मिती कंपन्यांकडून ती वीज खरेदी करावी लागते. निर्मिती केंद्रापासून ग्राहकांपर्यंत विजेचे वहन पारेषण कंपन्याच्या विद्युत यंत्रणेतुन करावे लागते. वीज खरेदीसह पारेषण खर्च तसेच विविध कर्ज व त्याच्या हप्त्यांचे कोट्यावधी रुपयांचे दायित्व सध्या महावितरणवर आहे.  Action on electricity bill arrears

Action on electricity bill arrears

त्यासोबतचं दुसरीकडे वीजग्राहकांकडे खूप मोठया प्रमाणात थकबाकी आहे. महावितरणवर दैनंदिन खर्च भागविण्याची कसरत करताना थकबाकी व कर्जाचे दुहेरी आर्थिक संकट ओढवल्याने अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा स्थितीत वीज ग्राहकांनी वीज सेवेचा मोबदला वेळेत अदा करून सहकार्य करणे गरजेचे आहे. ग्राहक वापरलेल्या इतर सर्व सेवांची देणी वेळेत अदा करतात. मात्र वीज ही मूलभूत सेवा असतानाही विजेचे बिल वेळेत भरण्यास चालढकल करतात. ग्राहकांनी विजेचे वीज बिल वेळेत भरावे, या करिता वीज अधिकारी- कर्मचाऱ्यांनी थकबाकीदार ग्राहकांची वीज खंडित करण्याची कारवाई करावी, त्या कारवाईत सातत्य राखावे, असे निर्देश सहव्यवस्थापकीय संचालक डांगे यांनी दिले. वीज यंत्रणा देखभाल दुरुस्तीच्या मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेऊन मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सज्ज राहणेबाबत त्यांनी सूचना दिल्या. Action on electricity bill arrears

श्री. डांगे यांनी मीटर रिडींग एजन्सींची बैठक घेतली. ग्राहकांना वीज वापरानुसार अचूक व योग्य वीज बिलांचे वितरण झाले पाहिजे. त्या दृष्टीने ग्राहकांच्या वीज मीटर रीडिंगचे दरमहा अचूक वाचन करण्यासंदर्भात मीटर रिंडींग एजन्सींना आदेशीत केले. ज्या एजन्सी मीटर रिडींग कामी हयगय करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी ठणकावले आहे. Action on electricity bill arrears

कोकण प्रादेशिक विभागाचा सहव्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर श्री.डांगे हे विभागातील सर्व परिमंडळाचे दौरे करून आढावा बैठका घेत आहेत. त्यात रत्नागिरी येथे परिमंडल कार्यालय स्तरावर त्यांनी ही बैठक घेतली. या बैठकीमुळे सर्व वीज अधिकारी- कर्मचाऱ्यांना एक नवी ऊर्जा मिळाली असून नव्या जोमाने काम करण्याचा संकल्प सर्वांनी केला आहे. सदरच्या बैठकीला सिंधुदुर्ग व रत्नागिरी मंडलातील सर्व कार्यकारी अभियंते, सर्व उपविभागीय अभियंते, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. Action on electricity bill arrears

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.