केंद्रीय समितीने केले सर्वेक्षण, स्वच्छता गृह उभारणी 100 टक्के
रत्नागिरी दि. 01 : रत्नागिरी जिल्हयातील नगरपरिषद/ नगरपंचायतींना मिळालेल्या एकूण 2272 उद्दिष्टांपैकी सर्व उद्दिष्ट पूर्ण केले असून 2272 लाभार्थ्यांस शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ या योजनेचा लाभ देऊन वैयक्तिक शौचालय बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. केंद्र शासनाच्या समिती मार्फत याबाबतचे सर्वेक्षण पूर्ण झाले. त्यानंतर रत्नागिरी जिल्हयातील नागरी भाग हगणदारीमुक्त (ODF) झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. Ratnagiri district urban part ODF

देशातील सर्व शहरातील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे याकरीता शहरांना स्वच्छतेची आणि या शहरामधील सर्व नागरिकांना शौचालयाची सुविधा उपलब्ध देवून करण्याकामी केंद्र शासनाने २ ऑक्टोबर २०१४ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्म तिथी निमित्त ‘स्वच्छ भारत अभियान (नागरी)’ या उपक्रमाची घोषणा केली. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामधील ज्या कुटुंबाकडे शौचालयांची सुविधा उपलब्ध नाही अशा कुटुंबाना वैयक्तिक अथवा सामुदायिक शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देऊन शहरे हागणदारीमुक्त ( ODF) करणे व घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ अंतर्गत शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करून शहरे स्वच्छ करणे या दोन प्रमुख बाबींचा स्वच्छ भारत अभियानामध्ये समावेश आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधणेकामी केंद्र शासनाकडून 04 हजार रुपये प्रती लाभार्थी, राज्यशासनाकडून 08 हजार रुपये प्रती लाभार्थी असे एकूण 12 हजार रुपये प्रती लाभार्थी अनुदान वितरीत येते. तर, नगर परिषद / नगरपंचायत मार्फत 05 हजार रुपये प्रती लाभार्थी इतके अनुदान देण्यात येत आहे. Ratnagiri district urban part ODF
रत्नागिरी जिल्हयातील शहरे हागणदारीमुक्त करण्याच्या दृष्टीने ज्या कुटुंबांना शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याने ते उघड्यावर शौचास २२७२ इतके वैयक्तिक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. रत्नागिरी जिल्हयातील लाभार्थ्यास वैयक्तिक शौचालय बांधणेकामी 17 हजार रुपये इतके प्रती शौचालय अनुदान देण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्हयातील नगरपरिषद/ नगरपंचायतींना मिळालेल्या एकूण 2272 उद्दिष्टांपैकी सर्व उद्दिष्ट पूर्ण केले असून 2272 लाभार्थ्यांस शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ या योजनेचा लाभ देऊन वैयक्तिक शौचालय बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. याचेच फळस्वरूप म्हणजेच केंद्र शासनाच्या समिती मार्फत झालेल्या सर्वेक्षणामध्ये रत्नागिरी जिल्हयातील नागरी भाग हगणदारीमुक्त (ODF) झाला आहे. येणेप्रमाणे, केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) या उपक्रमाची यशस्वीरित्या अंमलबजावणी झाली आहे,असे जिल्हा सह आयुक्त, नपाप्र, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांनी कळविले आहे. Ratnagiri district urban part ODF