गुहागर शहर भाजपाचे नगरपंचायत प्रशासनाला निवेदन
गुहागर, ता. 31 : गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील पोलिस परेड मैदान येथील स्वच्छतागृह दुरुस्त व स्वच्छ करण्यात यावे. पर्यटक आणि चाकरमानी यांची होणारी गैरसोय दूर करावी, या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी गुहागर शहर अध्यक्ष संगम मोरे यांच्या पुढाकाराने गुहागर नगरपंचायत प्रशासनाला देण्यात आले आहे. BJP’s statement to the Nagarpanchayat

या निवेदनबाबत नगरपंचायतचे श्री. पेडामकर यानी आम्ही लवकरात लवकर या गोष्टीची कार्यवाही करु असे अश्वासन दिले . यावेळी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, गटनेते श्री. उमेश भोसले, स्वीकृत नगरसेवक संजय मालप, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष श्रीम. श्रद्धा घाडे, युवामोर्चा शहर अध्यक्ष मंदार पालशेतकर, उपाध्यक्ष श्री हेमंत बारटक्के, युवामोर्चा शहर सचिव कु. प्रथमेश परांजपे उपस्थित होते. BJP’s statement to the Nagarpanchayat