• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रेसर बाईकला अपघात

by Manoj Bavdhankar
May 30, 2022
in Guhagar
16 0
0
Racer Bike Accident

Racer Bike Accident

32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दोघेही वाचले, ॲक्टिवाचे नुकसान

गुहागर, ता. 30 : हातात काचेची बाटली घेवून रेसर बाईक  भरधाव वेगाने चालवणारा दुचाकीस्वार उभ्या असलेल्या ॲक्टिवावर आटपला. Racer Bike Accident नशिबानेच घरात घुसला नाही. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाही. काचेची बाटलीही हातात सुखरुप राहीली. ग्रामस्थांनी तडाखे दिल्यावर अखेर नुकसानभरपाई देण्यास दुचाकीस्वार कबुल झाले आणि हे प्रकरण तडजोडीने सुटले. मात्र वेगाने दुचाकी चालवणाऱ्यांना पोलीसांनी आवरावे. ही मागणी आता ग्रामस्थांकडून होवू लागली आहे. (Racer Bike Accident)

Racer Bike Accident
Racer Bike Accident

Racer Bike Accident

सोमवारी, सायंकाळी 6.30 च्या सुमारास गुहागर खालचापाट येथे विखारे यांच्यासमोर हा अपघात घडला. दोन युवक दिड लाखापेक्षा जास्त किंमतीच्या रेसर बाईकवरुन भरधाव वेगाने गुहागरकडून असगोलीच्या दिशेने जात होते. त्यांच्या हातात काचेची बाटली होती. खालचापाट येथील वळणात दुचाकीस्वाराचे रेसर बाईकवरील नियंत्रण गेले. आणि रेसर बाईक थेट विखारे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या ॲक्टिवावर जावून आदळली. नशिबानेच रेसरबाईक घरात घुसली नाही. अन्यथा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असते. आणखी सुदैवाची गोष्ट म्हणजे रेसर बाईकवरील युवकांच्या हातात असलेल्या काचेची बाटली फुटली नाही. त्यामुळे रेसर बाईकवरील दोघेही जखमी झाले नाहीत. समोरील धडक बसलेल्या उभ्या दुचाकीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताने विखारे यांच्या घरातील महिला मात्र चांगल्याच घाबरल्या होत्या. (Racer Bike Accident)

Racer Bike Accident
Racer Bike Accident

अपघाताची माहिती कळताच आजुबाजुचे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यापुर्वीही भरधाव वेगाने दुचाकी चालवणाऱ्या युवकांमुळे अनेकजण अडचणीत आले होते. त्यामुळे ग्रामस्थ संतापले. रेसर बाईकवरील दोघांनी दोन चार फटके दिले. अखेर दोघांनी हात जोडून क्षमा मागितली. ग्रामस्थांनी दोघांची चौकशी केली. तेव्हा हे दोन्ही युवक वेळणेश्र्वर मधील असल्याचे समोर आले. अखेर त्यांच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती दिली. नुकसानग्रस्त ॲक्टिवाचे संपूर्ण कामाचा मोबदला देण्याचे सदर युवकांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी कबुल केले. त्यानंतर हे तडजोडीने मिटवण्यात  आले. या अपघातामुळे वेगाने दुचाकी चालविणाऱ्या चालकांवर कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. (Racer Bike Accident)

Tags: AccidentGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRacer Bike Accidentटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.