• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दाभोळ येथे स्मृतिगंध सोहळा संपन्न

by Ganesh Dhanawade
May 30, 2022
in Ratnagiri
16 0
0
Smritigandh ceremony held at Dabhol
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

लोकमान्य टिळक विद्यालयाचे १९९०-९१ चे विद्यार्थी तब्बल ३२ वर्षांनी भेटले

गुहागर, ता. 30 : दाभोळ येथील लोकमान्य टिळक विद्यालयाच्या १९९०-९१ च्या दहावी झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्मृतिगंध सोहळा घेण्यात आला. हा सोहळा दाभोळ खालचा विभाग- सुरुबन जवळील दत्त मंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. सर्वांना एकत्र आणण्याचे काम शिल्पा दाबके, सुरेंद्र कुडाळकर, दशरथ तोडणकर व दिलखुष आडेकर यांनी केले. यावेळी २६ मित्र-मैत्रिंणी एकत्र आले होते. Smritigandh ceremony held at Dabhol

शाळा संपून ३२ वर्ष झाली. प्रत्येकजण आपापल्या संसार, उद्योग, व्यापार, नोकरीत गुंतलेला. प्रत्येकाचे ठिकाणही वेगळे मात्र एकत्र येण्याची इच्छा असेल तर इतक्या वर्षांनीही जुने मित्र- मैत्रिणीं भेटू शकतात हे साध्य केले आहे.‌ या स्मृतिगंध सोहळात गाणी व एकत्र गप्पा-टप्पा करीत शाळेतील आठवणींना या विद्यार्थ्यांनी उजाळा दिला. वॉट्सअपवर सर्वांचा ग्रुप बनवून या सोहळ्यात २६ मित्र-मैत्रिंणी एकत्र आले. Smritigandh ceremony held at Dabhol

Smritigandh ceremony held at Dabhol

विवेक घोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमास सुरुवात झाली. मनोज पावसकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व उपस्थितांचे स्वागत केले. सौ. स्नेहल पावरी यांनी ईशस्तवन सादर केले. तर स्वागतगीत उपेंद्र दाभोळकर यांनी सादर केले. प्रत्येकाची ओळख करून दिल्यानंतर सौ. स्नेहल पावरी यांचा या कार्यक्रमात यथोचित सत्कार करण्यात आला. अप्रतिम सुग्रास जेवणाने प्रथम सत्र संपले. ‌‌ Smritigandh ceremony held at Dabhol

दुसऱ्या सत्रात अंताक्षरीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. ३२ वर्षानंतर आपल्या मित्र- मैत्रिणींना भेटण्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनीच मेहनत घेतली. वरील बॅचचे काही माजी विद्यार्थी आपल्या अडचणींमुळे या स्मृतिगंध सोहळ्यास उपस्थित राहू शकले नाहीत मात्र सर्वांना त्यांची उणीव भासली. आजचा स्मृतिगंध सोहळा दिमाखात संपन्न झाला. Smritigandh ceremony held at Dabhol

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSmritigandh ceremony held at Dabholटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.