• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

नरवण मधील दत्ता जोगळे यांना राज्यस्तरीय पुरस्कार

by Manoj Bavdhankar
May 30, 2022
in Guhagar
16 1
0
State level award to Jogle from Narwan
32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानच्या वतीने सांस्कृतिक गौरव पुरस्कार

गुहागर, ता. 30 : तालुक्यातील नरवण गव्हाणवाडी येथील सुप्रसिद्ध श्री दत्ताराम उर्फ दत्ता पांडुरंग जोगळे यांना राज्यस्तरीय सांस्कृतिक गौरव पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार सांस्कृतिक क्षेत्रामध्ये गेले पन्नास वर्ष अधिराज्य गाजविणाऱ्या श्री जोगळे यांना महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या वतीने देऊन गौरवण्यात आला. State level award to Jogle from Narwan

त्यावेळी महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज पाटील, गुहागर नगरपंचायतीचे माजी सभापती श्री माधव साटले, पदाधिकारी क्षितिजा मोरे, तसेच सामाजिक कार्यकर्ते, रामाने व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. State level award to Jogle from Narwan

श्री दत्ताराम जोगळे यांनी गेली चाळीस वर्ष रंगमंच गाजवले आहे. तमाशा मध्ये स्त्री पात्राची भूमिका करून रसिक प्रेक्षकांचे मनमुराद निखळ असे मनोरंजन केले आहे. त्यांनी भूमिका केलेले अखेर मी सौभाग्यवती, सासु वार, सांभाळ तुझं सौभाग्य, देवाघरचा न्याय, लग्नाआधी वरात, जावई चालून आला, शोधू कुठे किनारा, ग्रहण लागले चंद्राला, मृत्यू वाकला शंभू पुढे, कल्पवृक्ष कन्येसाठी, दोष कुणाचा, वेगळं व्हायचंय मला, पर पुरुष, माझा कुणा म्हणू मी, लाजविले या वैभवाला, मातीत मिसळले मोती, वाहते गंगा त्यागाची, जगी ज्यास कोणी नाही, दैव जाणिले कुणी, देवता, दिवा नाही दारी, मंदिर दीप, उजळला भाग्याचा, माझ्या सासरच्या मंदिरी, गाभारा, पाऊलेचालती, करीन ती पूर्व, कट्टर वैरी, एक माती अनेक नाती, बी नाम, कथा रंगली, पाषाणाची जावळिचा रणझुंजार, तपस्वी, कुटुंब, नवा संसार, फुलाला सुगंध मातीचा ही नाटके खूप गाजली. प्रतिभावंत  नाट्य कलावंत श्री दत्‍तराम जोगळे यांनी सर्व प्रकारच्या भूमिका तमाशामध्ये केल्या आहेत. State level award to Jogle from Narwan

हरहुन्नरी तमाशा कलावंत व प्रतिभावंत नाट्यकलावंत श्री दत्ताराम जोगळे यांच्या या सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय सांस्कृतिक गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. State level award to Jogle from Narwan

त्यावेळी बोलताना अध्यक्ष मनोज पाटील म्हणाले  की दत्‍तराम जोगळे यांच्यासारख्या अभिजात तमाशा कलावंत व नाट्यकलावंत यांनी कोकणची लोककला खऱ्या अर्थाने जपली, रंगभूमीची सेवा केली. त्यांच्या या सांस्कृतिक योगदानाचा महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानला अभिमान वाटतो. राज्यस्तरीय सांस्कृतिक गौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे कार्याध्यक्ष दिगंबर पाटील, युवा नेते सचिनजी जाधव, कलावंत दिपक आरेकर, समीर पवार, कार्यक्रम समन्वयक नितीन घरट, प्रकाश गोरे, प्रभुनाथ देवळेकर, अमोल वराडकर, शोधन वराडकर, नंदकुमार रोहित कर शंकर कोलथरकर, देवराम भोसले आदी मान्यवरांनी अभिनंदन केले. तसेच सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. State level award to Jogle from Narwan

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarState level award to Jogle from Narwanटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.