रत्नागिरी, ता. 30 : हातिसमधील अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत कल्पवृक्षाचे सानिध्यात वाढलेल्या ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार हातिस ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ व नारळाचे रोप देऊन करण्यात आला. Honoring senior citizens in Hatis
हातिसमध्ये पंचाहत्तरी पार केलेले ज्येष्ठ ज्यामध्ये लिलाकांत बाबाजी नागवेकर, उत्तम पांडुरंग नागवेकर, जयवंत धोंडू नागवेकर आणि विजय उर्फ बबन रामचंद्र नागवेकर यांचा सन्मान करण्यात आला. त्यांनी त्यांच्या बालपणी हे नारळाचे झाड भैरी-जुगाई मंदिरात लावले गेले. या झाडांबरोबरच त्याच्या सानिध्यात ही मंडळी वाढत आपलं जीवन व्यतित करत आहेत. त्याकाळातील काही स्पष्ट तर काही पुसट आठवणीना ते आजही उजाळा देतात. अशा या ज्येष्ठाना प्रत्येकी एक नारळाचे रोप डॉ. दिलीप नागवेकर यांच्याकडून देण्यात आले असून ते त्याची लागवड करतील आणि त्यांची पुढील पिढी त्याचा सांभाळ करतील अशी अपेक्षा आहे. Honoring senior citizens in Hatis


या कार्यक्रमास कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर, पंचायत समितीचे माजी सभापती कुमार शेट्ये, पंचायत समिती रत्नागिरी माजी सदस्य महेंद्र झापडेकर, मरिनर दिलीप भाटकर, महेंद्र झापडेकर इब्राहीमपट्टणचे अध्यक्ष गनीभाई बंद्री, सरपंच सौ. कांचन नागवेकर, हातिस ग्राम विकास मंडळ हातिसचे अध्यक्ष दिवाकर नागवेकर, मुंबईचे अध्यक्ष शंतनू नागवेकर, पोमेंडीच्या रोपवाटिकेचे प्रमुख राजेंद्र कुंभार उपस्थित होते. ॲड. तुषार नागवेकर यांनी आभार मानले. Honoring senior citizens in Hatis