गुहागर, ता. 28 : श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागरच्या सन 1997 मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचे नुकतेच गुहागर तालुक्यातील तळवली येथील द लेटन फार्महाऊस येथे स्नेहसंमेलन पार पडले. Alumni get-together

गुहागर हायस्कूलच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन माजी विद्यार्थी ग्रुपची स्थापना केली आहे. सामाजिक कार्याबरोबरच आपल्या माजी विद्यार्थ्यांची अडचण दूर करण्यासाठी हा ग्रुप प्रयत्न करत असतो. हे करत असताना माजी विद्यार्थ्यांमध्ये ऋणानुबंध अधिक घट्ट व्हावी यासाठी या संमेलनाचे आयोजन केले होते. या संमेलनामध्ये गुहागरसह अन्य ठिकाणी कामधंद्यासाठी असलेले माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी शाळेतील आठवणींना उजाळा व पुढील वाटचाली संदर्भात चर्चा करण्यात आली. Alumni get-together
यावेळी माजी विद्यार्थ्यांमध्ये डॉ. अनिकेत गोळे, डॉ. लिना बोले, श्री जयदेव मोरे, श्री सागर मोरे, अमृता लाड, लतिका साळुंखे, प्रसन्ना दामले, योगिता वझे, शलाका भोसले,श्री सुबोध सातार्डेकर, श्री मनोज गोलटकर, श्री गणेश भोसले, श्री दर्शन देवकर, श्री सचिन साटले, श्री साईनाथ डावल, श्री मनोज बारटक्के, श्री उदय महाडिक, श्री अनिल शिंदे, श्री सचिन देवरुखकर श्री योगेश तोडणकर आदी उपस्थित होते. यावेळी फनी गेम्सचा आनंदही या विद्यार्थ्यांनी लुटला. Alumni get-together