गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा उपक्रम
रत्नागिरी, ता. 21 : गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरीच्या (Gogte Joglekar College Ratnagiri) प्लेसमेंट विभागातर्फे (Placement Dept.) कॅम्पस इंटरव्ह्यूचे (Campus interview) आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस विविध कंपन्या व बॅंकांचे अधिकारी महाविद्यालयात उपस्थित रहाणार आहेत. मुलाखत, निवड, प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अशी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. Campus interview in Gogte Joglekar College


रविवार दि. २२ मे २०२२ रोजी सकाळी १० वा. आणि बुधवार दि. २५ मे २०२२ रोजी सकाळी १० वा. अशा दोन टप्प्यात हा उपक्रम होणार आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीमधील सेमिनार हॉलमध्ये उपस्थित रहावे. असे आवाहन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे. Campus interview in Gogte Joglekar College
रविवार दि. २२ मे २०२२ रोजी रांजणगाव पुणे येथील इकोरिया कुरोडा इलेक्ट्रिक इं. प्रा. लि. (Ecorea Kuroda Electric Inc. Pvt. Ltd.) इरोन इंडस्ट्रीयल सिस्टम्स प्रा. लि. (Iron Industrial Systems Pvt. Ltd.), हायर अॅप्लायन्सेस प्रा. लि. (Haier Appliances Pvt. Ltd.) इ. कंपन्यांमधील विविध पदांकरिता कॅम्पस इंटरव्ह्यू (Campus interview) होणार आहेत. या कंपन्यांच्या मुलाखतीसाठी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये महाविद्यालयातून पदवी घेतलेले व २०२१-२२ या वर्षामध्ये पदवी परीक्षेला बसलेले आर्ट्स, सायन्स व कॉमर्स विद्याशाखांमधील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित राहू शकतात. Campus interview in Gogte Joglekar College
हे कॅम्पस इंटरव्ह्यू (Campus interview) गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने ध्येय अॅकॅडमी ऑफ स्कील डेव्हलपमेंट आणि पुणे येथील टी.एस.पी.एल. ( T S P L ) ग्रुपच्या सहकार्याने आयोजीत केले आहेत. रविवार दि. २२ मे २०२२ रोजी सकाळी १०.०० पासून मुलाखतीची प्रक्रिया सुरु होईल. संबंधित विद्यार्थ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. असे आवाहन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे. Campus interview in Gogte Joglekar College


बुधवार दि. २५ मे २०२२ रोजी बँकिंग क्षेत्राशी संबंधित कॅम्पस इंटरव्ह्यू (Campus interview) होणार आहेत. या मुलाखती गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (Gogte Joglekar College Ratnagiri) प्लेसमेंट विभागाने (Placement Dept.) पुणे येथील ग्लोबल कोथरूड (Global Kothrud), एज्युकेशन विंग, टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप (Education Wing, Times of India Group) यांच्या सहकार्याने घेण्यात येणार आहेत. यामध्ये आय.सी.आय.सी.आय. बँक ( ICICI Bank ), एच.डी.एफ.सी. बँक (HDFC Bank), अॅक्सिस बँक (Axis Bank), येस बँक (Yes Bank), इंडस इंड बँक (Indus Ind Bank), कोटक बँक (Kotak Bank), आर.बी.एल बँक (RBL Bank)., बंधन बँक (Bandhan Bank), डी.सी.बी बँक (DCB Bank) इ. या बँका सहभागी होणार आहेत. Campus interview in Gogte Joglekar College
बँकेमधील जागांच्या उपलब्धतेनुसार निवड होईल. त्यासाठी मुलाखत, निवड, प्रशिक्षण आणि प्लेसमेंट असे प्रक्रियेचे स्वरूप आहे. याची सविस्तर माहिती महाविद्यालयाच्या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. Campus interview in Gogte Joglekar College
बँकिंग क्षेत्रातील प्लेसमेंट (Placement) साठी २०१९-२०, २०२०-२१ शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेले व २०२१-२२ या वर्षात पदवी परीक्षेला बसलेले विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. इच्छुक विद्यार्थ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत, मोबा. ९४२११ ४२५२९ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्रा. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे. Campus interview in Gogte Joglekar College