मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकरांचे नाव द्यावे
रत्नागिरी, ता. 19 : मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. Statement of Press Council to District Collector


रायगडमध्ये बरीच वर्षे रखडलेले हे काम सुरु होण्यासाठी पत्रकार संघटना रस्त्यावर उतरली होती. हा महामार्ग केवळ कोकणातील पत्रकारांनी सलग सहा वर्षे लढा दिल्याने होत आहे हे वास्तव सर्वांना माहिती आहे. या महामार्गाला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचं नाव द्यावे, या मागणीसाठी देताना मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. Statement of Press Council to District Collector


जिल्हाधिकारी यांच्यामार्फत या बाबत शासनाकडे मागणी करणारे निवेदन मराठी पत्रकार परिषदेच्या रत्नागिरीतील एका शिष्टमंडळाने दिले. गेल्या काही वर्षापासून काम युद्धपातळीवर सुरु असलेला मुंबई – गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्ग लवकरच खुला होणार आहे. महामार्गाचे रखडलेले काम दिवसरात्र अत्याधुनिक मशिनरीच्या मदतीने पूर्ण केले जात आहे. Statement of Press Council to District Collector