• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

उमराठ कोंडवीवाडीत आरोग्य तपासणी शिबीर

by Guhagar News
May 16, 2022
in Health
16 0
0
Health check-up camp at Umrath
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

उदय दणदणे, निवोशी
गुहागर, ता. 16 :   हेदवी आरोग्य केंद्रातर्फे (Hedvi Health Center) शुक्रवार दि.  ८ एप्रिल २०२२  शुक्रवार रोजी कोंडवीवाडी, अंगणवाडी येथे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबीरामध्ये  ३० वर्षांवरील सर्व स्त्री-पुरुष ग्रामस्थांसाठी मोफत असांसर्गिक आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (NCD) आरोग्य तपासणी करण्यात आली.  याचे उद्घाटन उमराठचे सरपंच श्री जनार्दन आंबेकर व  उमराठ आरोग्य उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी प्रिया उरकुडे यांच्या हस्ते करण्यात आले. Health check-up camp at Umrath

उमराठ कोंडवीवाडीत प्रथमच आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. प्रतापराव गुजोंटे यांनी लॅब टेक्निशियन समीरा पाटील आणि आरोग्य सेवक अजय हळये, आशा सेविका  सौ. पुजा माटल या टिमला उमराठमध्ये पाठवले होते. उमराठच्या आशा सेविका सौ. वर्षा गावणंग आणि उमराठ आरोग्य उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी प्रिया उरकुडे यांनी सहकार्य केले. Health check-up camp at Umrath

याशिबिरामध्ये आरोग्य  तपासणी करून घेण्यासाठी ग्रामस्थांनी उत्तम प्रतिसाद दिला.वैद्यकिय टिमने साथीचा सर्दी/ताप, खोकला, वजन, उंची, ब्लड प्रेशर, डायबेटिस बाबत रक्त तपासणी, स्त्री/पुरूषांचे इतर आजार इत्यादीं बाबतीत तपासणी करण्यात आली.

आरोग्य विभागाचा उद्देश समजावून सांगताना समुदय आरोग्य अधिकारी प्रिया उरकुडे यांनी सांगितले की, सद्य परिस्थितीत अन्नधान्य पदार्थांत होणारी भेसळ प्रदुषण युक्त वातावरण यामुळे अनेक साथीचे आजार वाढण्याची शक्यता असते. ते अधिक पसरू नये म्हणून प्रबोधन करून फैलावणारे आजार नियंत्रणात आणले जावे यासाठी असांसर्गिक आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या तपासणीत काही दोष आढळल्यास त्या व्यक्तीला  अधिक उपचारांसाठी योग्य ते मार्गदर्शन केले जाईल. Health check-up camp at Umrath

शिबिरात उमराठच्या कोंडवीवाडीतील ३० वर्षांवरील सुमारे ५९ स्त्री/पुरूष ग्रामस्थांनी तपासणी सुविधेचा लाभ घेतला. सदर आरोग्य तपासणी शिबीरात सहभागी होऊन सहकार्य केल्याबद्दल डॉ. प्रतापराव गुजोंटे सरांचे तसेच संपूर्ण आरोग्य तपासणी टिमचे तसेच उत्तम नियोजन केल्याबद्दल कोंडवी उत्कर्ष मंडळ आणि महिला मंडळ या सर्वांचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी शुभेच्छा देऊन आभार मानले. Health check-up camp at Umrath

कोंडवी उत्कर्ष मंडळ आणि महिला मंडळ यांच्यातर्फे वैद्यकीय टीम, उपस्थित जेष्ठ ग्रामस्थ वाडी प्रमुख/मंडळाचे अध्यक्ष श्री भिकू मालप, माजी उपसरपंच गणपत गावणंग, माजी अध्यक्ष देवजी गावणंग, ग्रामस्थ सोनू धनावडे, शांताराम गावणंग व महिला प्रतिनिधी म्हणून महिला मंडळाच्या अध्यक्षा लतिका गावणंग यांचा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. Health check-up camp at Umrath

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन उमराठ कोंडवीवाडी प्राथमिक शाळेचे शिक्षक संजय सोनवणे सर यांनी केले. तर नियोजनात उमराठ ग्रामपंचायतीचे कारकून नितीन गावणंग तसेच उदय गावणंग यांनी त्यांना मदत केली.  Health check-up camp at Umrath

Tags: GuhagarGuhagar NewsHealth check-up camp at UmrathHedvi Health CenterLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.