गुहागर, ता. 16 : स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य वै. ह. भ. प. आत्माराम महाराज सोलकर यांचा समाधी व वर्ष श्राद्ध विधी सोहळ्यानिमित्त चिखली येथे १६ ते १८ मे २०२२ पासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. Organizing various events at Chikhli


यानिमित्त सोमवार दि. १६ मे रोजी सकाळी १० वा. कलश पूजन, सकाळी ११ वा. गाथा भजन, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं.४ वा. हरिपाठ, सायं. ५ वा. प्रवचन ह. भ. प. मोहन संसारे, सायं. ७ वा. ह. भ. प. प्रकाश महाराज सोलकर यांचे कीर्तन, रात्री ९ वा. महाप्रसाद, मंगळवार दि. १७ मे रोजी सकाळी ८ वा. समाधी सोहळा व वर्ष श्राद्ध विधी, अस्थीसिंचयन विधी, सकाळी १० वा. ह. भ. प. माधव महाराज शिवणीकर (पंढरपूर), दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं. ४ वा. हरीपाठ, सायं. ५ वा. ह. भ. प. बबन महाराज कुंभार यांचे प्रवचन, सायं. ७ वा. ह. भ प. रुपेश महाराज राजेशिर्के यांचे कीर्तन बुधवार दि. १८ मे रोजी सकाळी १० वा. गाथा भजन व ह. भ. प. नंदूअप्पा जाधव यांचे समारोपाचे कीर्तन होईल. Organizing various events at Chikhli


तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संतोष सोलकर, लक्ष्मी सोलकर, अपर्णा गावणकर, कल्पना आदवडे, विष्णू सोलकर, मोहन सोलकर, प्रकाश सोलकर यांनी केले आहे. Organizing various events at Chikhli