सायकलस्वारांनी केले उपजिल्हा रुग्णालय रक्तदान
गुहागर, ता. 16 : रविवार दि. १५ मे २०२२ रोजी परिचारिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे सायकल फेरी काढण्यात आली होती. यावेळी उपजिल्हा रुग्णालय दापोली (Dapoli Sub-District Hospital) येथील परिचारिकांना गुलाबपुष्प देऊन सायकलिंग क्लबने त्यांचे आभार मानले. सायकल फेरी झाल्यावर काही सायकलस्वारांनी उपजिल्हा रुग्णालयात सुरु असलेल्या शिबिरात रक्तदानही केले. Thanks to the nurses on behalf of the cycling club


वैद्यकीय क्षेत्रातलं परिचारिकांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय आरोग्य सेवा अपूर्ण आहेत. कोरोना काळात स्वता चा जीव धोक्यात टाकून परिचारिकांना रूग्णं सेवा केली. त्यांच्या या कार्याचा प्रातिनिधिक गौरव करण्याचे दापोली सायकलिंग क्लबने सायकल फेरी आयोजन केले होते. ही सायकल फेरी आझाद मैदानातून सुरू झाली. नॅशनल हायस्कूल- काळकाई कोंड आमराई – नशेमन कॉलनी- आझाद नगर – खोंडा- फिश मार्केट (National High School – Kalkai Kond Amrai – Nasheman Colony – Azad Nagar – Khonda – Fish Market) मार्गे 6 कि.मी. अंतर कापून उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे आली. Thanks to the nurses on behalf of the cycling club


रूग्णालयात उपस्थित असलेल्या रुग्णालय वैद्यकिय अधिक्षक डॉ महेश भागवत, इनचार्ज सिस्टर निर्मला जाधव, अनघा घाग, दापोली तालुका आरोग्य अधिकारी डॉ किशोर जाधव, अधिपरीचारीका साक्षी हांडे, प्रिया वंडकर, गायत्री भाटकर, स्नेहल गोकणे, जोगेश्वरी वळवी, निकिता घुगरे, अर्चना वसावे, स्वप्नाली दाभोळकर, मालिनी वसावे, दिपीका नांदगावकर आदी सहकाऱ्यांना सायकल स्वारांनी अभिवादन केले. यावेळी परिचारिकांनी निरोगी आरोग्यासाठी शरीराची, अवयवांची स्वच्छता, काळजी कशी घ्यायची याबद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात सुरु असलेल्या शिबिरात रक्तदान केले. Thanks to the nurses on behalf of the cycling club


सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने सर्वांसाठी दापोली सायकलिंग क्लबमार्फत विनामूल्यपणे सायकल फेरीचे आयोजन केले जाते. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात संदीप भाटकर, केतन पालवणकर, अंबरीश गुरव, विनय गोलांबडे, पराग केळसकर, सुरज शेठ, प्रशांत पालवणकर, झाहीद दादरकर, अमोद बुटाला इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. दैनंदिन जीवनात सायकलचा वापर अधिक करा आणि इतरांनाही प्रेरित करा असे आवाहनही आयोजकांनी केले आहे. Thanks to the nurses on behalf of the cycling club

