गुहागर, ता. 13 : मान्सूनपूर्व तयारी अंतर्गत तहसिलदार प्रतिभा वराळे यांनी आपत्ती व्यवस्थापन बैठक घेत तालुक्यातील दरडप्रवण क्षेत्राची पाहणी केली. तालुक्यातील 23 गावे दरडप्रवण क्षेत्रात येत असून महिना अखेर तेथील गावांना सतर्कतेबाबत सूचना देण्यात येणार आहे. Alerts to 23 villages in Guhagar


तालुक्यात गतवर्षी भातगांव तिसंग, वडद, परचुरी, कारूळ या गावांत सर्वांधिक नुकसान झाले होते. गतवर्षाप्रमाणे यावर्षीही पावसाची हजेरी लवकर असल्याने गुहागर महसूल विभागाने आधीच दरडप्रवण क्षेत्राला भेट देऊन तेथील उपाययोजनांबाबत चर्चा केली आहे. आपत्ती व्यवस्थापन बैठकीतून तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक या सर्वांची बैठक घेऊन पावसाळ्यात घ्यावयाच्या सतर्कतेबाबत मार्गदर्शन केले. तर तालुक्यातील दरडप्रवण गावातही जनतेला सतर्कतेबाबत नोटीस देऊन जागृती करण्यात येणार आहे. तहसिलदार प्रतिभा वराळे यांनी गटविकास अधिकारी डाँ. अमोल भोसले, जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता वैभव चौधरी यांच्यासमवेत दरडप्रवण गावांचा पाहणी केली. तेथील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांना बरोबर घेऊन ही पाहणी करण्यात आली आहे. Alerts to 23 villages in Guhagar


या तालुक्यात भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने सुचविल्यानुसार घरटवाडी तर्फे वेलदूर- नवगांव सिध्देश्वर नगर, नवानगर- विठ्ठलवाडी, धोपावे-तरीबंदर गुरववाडी, कोळीवाडीतर्फे चाळकेवाडीतर्फे धोपावे, तेटले, पेठ अंजनवेल- भोईवाडी, पालशेत-आगडीमंदिर चिंचबंदर वाडीखाते सावरपाटी, हेदवी पालशेत तवसाळ रस्ता, परचुरी- परचुरीड डाफळेवाडी रस्ता, साखरी त्रिशुळ- मोहल्ला म्हसकरवाडी रस्ता, पेवे सुतारवाडी रस्ता, तरबंदर आंबेरे रस्ता, आबेरेखुर्द ब्राम्हणवाडी रस्ता, आंबेरे- पाचेरी आंबेरे रस्ता, पाचेरी आगर काजरोळकरवाडी रस्ता, कोंडवाडी, भातगांव- मासू आंबेरे असोरे भातगांव रस्ता, काजुर्ली- कुंभारमळा, असोरे घाटी, शिर महालक्ष्मी रस्ता, वडद बौध्दवाडी, वडद, भातगांव तिसंग सुवरेवाडी, कारूळ अशी एकूण 23 गावे दरडप्रवण क्षेत्र घोषित करण्यात आली आहेत. Alerts to 23 villages in Guhagar

