रत्नाकर राजम यांचे नौका मालकांना आवाहन
गुहागर, ता. 13 : रत्नागिरीतील मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पातील जेटटी क्र.4 स्थानिक भाषेतील नाव मलबार जेटटी जी.पी.एस. नुसार स्थळ 17.000807°N; 73.281236°E या ठिकाणी मोडलेल्या स्थितीत असलेल्या बुडालेल्या व नष्ट झालेल्या अशा नौकांचे इंजिन व इतर पार्टस काढून घेण्यात यावेत. असे मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी रत्नाकर प्रभाकर राजम यांनी नौका मालकांना कळविले आहे. Rajam’s appeal to boat owners


मिरकरवाडा येथील बंदरात कोणतेही मूल्य न येणारे असे नौकांचे सांगाडे / अवशेष तिथेच सोडून दिले आहेत. या नौकांचे इंजिन व इतर पार्टसनी बंदरातील जागा व्यापली गेली आहे. यामुळे नौकानयनासाठी अडथळा होत आहे. हा अडथळा मच्छिमारी नौकासाठी धोकादायक झाला आहे. Rajam’s appeal to boat owners


तरी सदरच्या नौका / सांगाडे / अवशेष ज्यांच्या नौका आहेत त्यांनी ते 18 मे 2022 पर्यंत काढून टाकावेत. तसे न केल्यास ते मत्स्यव्यवसाय विभागामार्फत काढून टाकण्यात येतील, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी रत्नाकर प्रभाकर राजम, मिरकरवाडा, रत्नागिरी यांनी नौका मालकांना आवाहन केले आहे. Rajam’s appeal to boat owners