• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मार्गताम्हाने येथे रोजगार मेळावा संपन्न

by Guhagar News
May 11, 2022
in Guhagar
17 0
0
Employment fair held in Margtamhane
33
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालयात आयोजित

गुहागर, ता. 11 : शुक्रवार दिनांक 6 मे 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता स्वर्गीय रुक्मिणी गणपतराव चव्हाण सभागृह मार्गताम्हाने येथे रोजगार मेळाव्याचे आयोजित करण्यात आले होते. हा मेळावा मुंबई विद्यापीठाने महाराष्ट्र शासन व एन .ए. पी .एस. यांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात आला होता.  Employment fair held in Margtamhane

मुंबई विद्यापीठाने महाराष्ट्र शासन व एन .ए. पी .एस. यांच्या संयुक्त विद्यमाने पदवीधर व उच्च पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यासाठी रोजगाराभिमुख व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण योजना आखली आहे. याबाबत मुंबई विद्यापीठाचे स्वावलंबी चारित्रपूर्ण शिक्षणयोजना मार्गताम्हाने सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी संजीवनी असल्याबाबतचे उदगार मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान उपाध्यक्ष श्री. जयसिंगराव मोरे यांनी डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालयात (Dr.  Tatyasaheb Natu College Margtamhane)आयोजित रोजगार मेळावाप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.राजश्री कदम उपस्थित होत्या. Employment fair held in Margtamhane

आजकालचे महागडे शिक्षण व  त्यातून रोजगार मिळण्यामध्ये असणारी नकारात्मक स्थिती यामुळे ग्रामीण भागांमधून शिक्षणामध्ये फार मोठी गळती होत आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांना शिक्षणामधून रोजगार कसे मिळतील, या उद्देशाने मुंबई विद्यापीठाने .एन. ए. पी. एस. व महाराष्ट्र शासनाच्या अप्रेंटिस पोर्टल द्वारे विद्यार्थ्यांना विविध रोजगारभिमुख व्यवसायाचे मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी नोंदणी कार्यक्रम आयोजित केला आहे. बेरोजगार विद्यार्थ्यांना करियर डेवलपमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेद्वारे वरील पोर्टलवर नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अप्रेंटिस बाबत संधी उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ.तात्यासाहेब नातू महाविद्यालयांमध्ये सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांचा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. Employment fair held in Margtamhane

लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करत या रोजगार मार्गदर्शक मेळाव्याच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या रोजगार मेळाव्यास महाविद्यालयातील कला व वाणिज्य शाखेतील आजी व माजी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. पदवीधर विद्यार्थ्याने एन. ए.पी.एस .व महाराष्ट्र अप्रेंटिस पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर त्याला दररोज महाराष्ट्र व आजूबाजूच्या राज्यातील व्यवसायाच्या संधी बाबत अपडेट मिळत राहतील, जेणेकरून विद्यार्थी नोकरीसाठी तेथे अर्ज करून आपल्या कौशल्यानुसार रोजगाराची संधी प्राप्त करू शकेल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधीबाबत ही खरोखरच सुवर्णसंधी प्राप्त झाले आहे. त्यांच्या कौशल्यानुसार त्यांना नोकरी मिळणार आहे, याबाबत माहिती रोजगार मेळाव्यात देण्यात आली. Employment fair held in Margtamhane

संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री. मधुकररावजी चव्हाण, सर्व संचालक, पदाधिकारी यांनी मुंबई विद्यापीठाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल कौतुक केले आहे. कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. जयसिंगराव मोरे व सर्व आजी माजी विद्यार्थी यांचे स्वागत डॉ. संगीता काटकर यांनी केले. उपाध्यक्ष श्री जयसिंगराव मोरे यांनी आपल्या मनोगतामध्ये मार्गताम्हाने व आजूबाजू मधील ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी हा रोजगाराभिमुख प्लॅटफॉर्म खरोखरच संजीवनी देणार आहे, याबद्दल समाधान व्यक्त केले. तरी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन केले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. राजश्री कदम यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करत महाराष्ट्र शासन व मुंबई विद्यापीठाकडून आलेल्या या रोजगाराभिमुख पोर्टलच्या परिपत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना दिली . सदर पोर्टल वर नोंदणी कशी करायची तसेच शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये महाविद्यालयात करिअर काउंसलिंग मार्फत घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. सदर ऑनलाईन नोंदणी कशी करायची याबाबतची माहिती प्रा. प्रियांका गोयथळे यांनी दिली. Employment fair held in Margtamhane

महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु.दीप्ती कदम यांनी महाविद्यालयाने रोजगारभिमुख मेळावा आयोजित करत मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाच्या विविध रोजगारभिमुख योजनांची माहिती दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार डॉ.सुरेश सुतार यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ.सत्येंद्र राजे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनी यांनी परिश्रम केले. Employment fair held in Margtamhane

Tags: Dr. Tatyasaheb Natu CollegeEmployment fair held in MargtamhaneGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMargtamhaneNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.